API अश्विनी बिद्रे खून प्रकरणात बडतर्फ PI अभय कुरुंदकर दोषी…

मुंबई: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केजी पांडेवाल यांनी निकाल सुनावला आहे. या प्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकर हाच मुख्य दोषी असल्याचे म्हटले आहे. तो कलम ३०२ अंतर्गत दोषी आढळला आहे.

न्यायालयाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर ताशेरे मारताना अभय कुरूंदकर याला राष्ट्रपती पदकासाठी नाव सुनावणे फार गंभीर होते, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात झालेल्या तपासावरही न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. मयत अश्विनी बिद्रे मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावामधील आहेत. अश्विनी बिद्रे खून प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला हत्या प्रकरणी दोषी ठरवले असून महेश पळणीकर, कुंदन भंडारी या दोघांवर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने यादिवशी अश्विनी बिद्रे यांची मुलगी आणि पती यांना हजर राहण्यास सांगितले आहे.

अश्विनी ब्रिदे 11 एप्रिल 2016 रोजी बेपत्ता झाल्या होत्या. घटनेच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास त्या अभय कुरूंदकर याला भेटायला पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने रवाना गेला. याचवेळी कारमध्येच कुरूंदकरने बिद्रे यांची गळा दाबून हत्या केली. त्यावेळी त्याच्यासमवेत महेश फळणीकर असल्याचे देखील समोर आले होते. ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6. 41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला. हत्या केल्यानंतर आरोपीने लाकडं कापायच्या कटरने अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे केले. कुरूंदकर आणि फळणीकरने राजू पाटील आणि खासगी चालकाला सोबत घेत मध्यरात्री अश्विनी बिद्रेचे तुकडे कारमधून वसईच्या खाडीत फेकले. सर्व आरोपींविरोधात तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

अश्विनी बिद्रे या २००५ मध्ये पोलिस दलात रुजू झाल्या होत्या. त्या सांगलीत पोस्टिंग असताना मुख्य आरोपी अभय कुरुंदकरशी त्यांची ओळख झाली होती. दोघंही विवाहित असून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अश्विनी बिद्रे आणि अभय कुरूंदकर दोघांनाही मुलं होती. कुरूंदकर याने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे अश्विनी यांनी पती राजू गोरे यांच्यासोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे. जी आपल्या पित्याकडे राहते.

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…

पोलिस असलेल्या वर्गमित्राने मैत्रिणीची हत्या केली अन् मृतदेह…

पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…

महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…

पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!