
सहाच महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या सुनेने काढला सासूचा काटा; कारण आले समोर…
जालना: सहाच महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या सुनेने सासूचा निर्घृनपणे खून केल्याची घटना बुधवारी (ता. 2) पहाटे जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात घडली आहे. सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता संजय शिनगारे (वय 45, ह. मु, प्रियदर्शनी कॉलनी, जालना, मूळ रा. वावरे अंतरवाली, ता. गेवराई, जि. बीड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर प्रतीक्षा आकाश शिनगारे असे सुनेचे नाव आहे.
लग्न झाल्यानंतर मुलगा नोकरीनिमित्त लातूर येथो होता. तर दुसरीकडे सून कोणाशी तरी फोनवर बोलते आहे, पण नेमके कोणासोबत तिच्या गप्पा चालतात, हे सासूला समजत नव्हते. या कारणामुळे दोघींमध्ये काहीशी भांडणं होत होती. बुधवारी याच कारणामुळे दोघींमध्ये सकाळी वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या प्रतीक्षाने रागाच्या भरात सासू सविता शिनगारे यांच्यावर चाकूने सपासप वार करुन त्यांचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या प्रतिक्षा हिने सासू मृतदेह एका गोणीत भरला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नात ती होती. ती गोणी ओढत खाली आणली पण घरमालकाचे लक्ष आपल्याकडे आहे हे लक्षात येताच तिने ती गोणी तशीच ठेवून पळ काढला. तिने थेट रेल्वे स्टेशनला जाऊन परभणीतील घर गाठले. त्यानंतर घरमालकाने तत्काळ पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला, मृतदेह ताब्यात घेऊन फरार झालेल्या सुनेला ताब्यात घेतले आहे.
सविता शिनगारे यांचा मुलगा आकाश हा लातूर येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. त्यामुळे तो लातूर येथे राहायचा. आई सविता व पत्नी प्रतीक्षा या जालना येथील भाड्याच्या घरामध्ये राहात होत्या. प्रतीक्षा शिनगारे हिचे माहेर परभणी आहे. सासूचा खून केल्यानंतर तिने घराबाहेर पडत थेट रेल्वे स्थानक गाठले. तेथून परभणी येथील नातेवाइकांच्या घरी ती गेली. या घटनेनंतर तिच्या शोधात असणाऱ्या एलसीबीच्या पथकाने मोबाइल लोकेशनवरून परभणी शहर गाठत एका नातेवाइकांच्या घरातून तिला ताब्यात घेतले.
दरम्यान, आकाश लातूर येथून थेट जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. आईचा मृतदेह पाहून त्याने हंबरडा फोडला. “माझ्या आईला का मारलं? मारायचं होतं तर मला मारायचं, असं तो मोठमोठ्याने रडत रडत म्हणत होता. माझ्यासोबत पटत नव्हतं, तर लग्न करायचं नव्हतं. लग्न कशाला केलं? माझ्या आईसोबत पटत नव्हतं तर, मला मारायचं असतं, कोणी एवढे निर्दयीपणे मारतं का?”. आकाशचे रडणं पाहून अनेकांना रडू कोसळत होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने केली सासूची हत्या अन् बुलेटवरून झाली फरार…
पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…
शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…
मोबाईलवरून अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात दगड घालून केला खून…
पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…
चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…

