पुणे! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी; १० गुन्हे उघडकीस…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलाच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी करत वाहन चोरीचे एकुण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ मधील पोलिस अधिकारी व अंमलदार हे २८/०२/२०२५ रोजी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे हद्दीत गस्त घालत होते. पोलिस अंमलदार अमित गद्रे व बाळू गायकवाड यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी
१) डाडया ऊर्फ रियाज शार्दुल्ला शेख, वय- २१ वर्षे, रा. आमराई कोकाटे चाळ जवळ, पाषाण, पुणे
२) अनिल लिंगया भंडारी, वय ३४ वर्षे, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे कब्जात मिळून आलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे संशय
आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक तपास केला असता, त्यांनी पुणे शहर व इतर कार्यक्षेत्रातून दुचाकी वाहने विक्री करण्याचे उद्देशाने चोरी केलेली होती. नमुद आरोपींकडून किंमत ५,६०,०००/- रु.च्या एकुण १० दुचाकी वाहने असा मुद्देमाल हस्तगत करुन, खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
१) मुंढवा पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. १३/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
२) मुंढवा पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. १५/२०२५ बी. एन. एस. सन कलम ३०३(२)
३) सांगवी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४१/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
४) सांगवी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ५९/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
५) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. २२६ / २०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
६) बंडगार्डन पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. २४२/२०२४ बी. एन. एस कलम 20३(२)
७) कोथरुड पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ५८/२०२५ बी. एन. एस कलम ३०३(२)
८) बाणेर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. २०/२०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
९) राजगड पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हा रजि. नं. २६ / २०२५ बी. एन. एस कलम ३०३ (२)
१०) शिरगाव-परंदवडी पोलिस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, गुन्हा रजि. नं. १९६ / २०२४ बी.एन.एस कलम ३०३ (२)
वरीलप्रमाणे वाहनचोरीच्या गुन्ह्यातील एकुण १० दुचाकी वाहने असा एकुण ५,६०,०००/- रु.चा मुद्देमाल अटक आरोपींकडून जप्त करुन, १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची कारवाई ही अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलिस आयुक्त गुन्हे- १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस अंमलदार, अमित गद्रे, बाळु गायकवाड, अजित शिंदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, दत्तात्रय पवार, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, नारायण बनकर यांनी केली आहे.

पुणे पोलिस आयुक्तांनी आरोपी दत्ता गाडे बाबत दिली महत्तावाची माहिती; आत्महत्येचा प्रयत्न…

पुणे वाहतूक पोलिस ऍकेडमीत 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण…

पुणे शहरातील वारजे माळवाडीतील गुंडाची आता खैर नाही…

पुणे शहरात तडीपार आरोपीकडून दुचाकी केली जप्त; पाहा दुचाकीचा क्रमांक…

पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!