पत्नीचे अनैतिक संबंध; नवऱ्याने उचलले धक्कादायक पाऊल…

नागपूर: नागपुरच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नी तिच्या प्रियकराला हाताशी धरून मानसिक आणि शारिरीक छळ करत असल्याचे चिठ्ठीत लिहीले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुर्गेश्वरी नरेंद्र ठाकरे (वय 41) आणि राहुल मनोहर (वय 45) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी दुर्गेश्वरी ही नागपुरच्या गोधनी रेल्वे परिसरातील खान सोसायटीत वास्तव्याला होती. तिने प्रियकर राहुल याला हाताशी धरुन पतीला त्रास दिला. दुर्गेश्वरी हिचे पती नरेंद्र यांनी 17 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात छताच्या हुकला ओढणी बांधून गळफास घेतला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी मृत नरेंद्र यांच्या खोलीची झडती घेतली असता, त्यांना नरेंद्रने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली. त्यात नरेंद्रने दुर्गेश्वरी आणि राहुलमध्ये अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख केला होता. तसेच दोघेही मिळून त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत असल्याचा उल्लेख केला होता. या चिठ्ठीच्या आधारे मानकापूर पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलिस करत आहेत.

आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला समजलं अन्…

पत्नीसोबत होते शेजाऱ्याचे अनैतिक संबंध; सापळा रचला अन् जीव गेला…

वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…

धक्कादायक! सख्खा चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला बहिणीचा खून..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!