
पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेडया…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींना येरवडा तपास पथकाने बेडया ठोकल्या आहेत. आरोपीकडून एकूण ३०,००० रुपये किंमतीचे एकूण १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगून गुन्हे करणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर सुचनांच्या अनुषंगाने हिम्मत जाधव, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ४, प्रांजली सोनवणे सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग यांनी देखील सदरबाबत सूचना केल्या होत्याय त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलिस शिपाई १०७४९ अमोल गायकवाड व पोलिस शिपाई १०३६७ विशाल निलख हे दिनांक ०५/०२/२०२५ रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाडिया बंगलाजवळ, येरवडा, पुणे येथे दोन जण अग्नीशस्त्र विक्रीसाठी येणार आहे.
आरोपींबाबत माहिती मिळाल्याने तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोहवा २९२५ तुषार खराडे, पोअं १०७४९ अमोल गायकवाड, पोअं ८२७३ विशाल निलख, पोअं १०३६७ प्रशांत कांबळे, पोअं १०४८६ बालाजी सोगे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन दोन संशयीतांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १ पिस्टल व १ राऊंड मिळून आले.
१. प्रविण विकास कसबे (वय २९ वर्षे रा आंबेगाव कात्रज पुणे)
२. प्रतिक दादासाहेब रणवरे (वय २५ वर्षे रा येवलेवाडी पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. सदरबाबत ०५/०२/२०२५ रोजी येरवडा पोलिस स्टेशन येथे गु र नं १०४/२०२५ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलिस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३०,०००/- रु किंमतीचे एकूण १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळुंके करत आहेत.
सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह-आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, हिम्मत जाधव, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-४, प्रांजली सोनवणे सहा. पोलिस आयुक्त येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वपोनि येरवडा, पल्लवी मेहेर, पोनि गुन्हे, स्वाती खेडकर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळंके, सर्व्हेलन्स अधिकारी पोउपनि महेश फटांगरे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा १४२३ दत्ता शिंदे, पोहवा २९२५ तुषार खराडे, पोहवा ३२७२ किरण घुटे, पोहवा ७५१९ सागर जगदाळे, पोअं ८३३७ अनिल शिंदे, पोअं १०७४९ अमोल गायकवाड, पोअं ८२७३ विशाल निलख, पोअं १०३६७ प्रशांत कांबळे, पोअं १०४८६ बालाजी सोगे यांनी केलेली आहे.
पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…
पुणे शहरात दोन सराईत गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह केली अटक…
धक्कादायक Video: पुणे शहरात वृद्ध महिलेला लुटण्यासाठी युवतीने काय-काय केले पाहाच…
पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारा ताब्यात…
पुणे शहरात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच; रात्रीत 40 गाड्यांची तोडफोड…

