तुळजापूरजवळ पुलाखाली एक महिला आणि दोन पुरुषांचे आढळले मृतदेह…

धाराशिव : एका पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले असून, यामध्ये १ महिला आणि २ पुरुषांच्या मृतदेहाचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बाभळगावमध्ये ही घटना समोर आली आहे. सोलापूर हैदराबाद महामार्ग क्रमांक 65 वर बाबळगाव गावाजवळ ही घटना घडली आहे. पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले. 1 महिला आणि 2 पुरुषांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी पुलात आज दुपारी हे मृतदेह पाहिले होते. त्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

पुरुषाची ओळख पटली असून तो आनंदनगर, मुरूम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. महिला आणि दुसऱ्या पुरुषाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी घातपात की अपघात या दृष्टीने तपास सुरू केला आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास पोलिस करत आहेत.

नांदेडमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू…

मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…

सांगली हादरली! मोबाईल दुकानदारावर सपासप केले तब्बल 25 वार…

सैफ खरंच जखमी होता की, फक्त अ‍ॅक्टिंग? रिक्षा चालकाने सांगितलं…

Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

लखोबा लोखंडे! पोलिस फौजदार असल्याचे सांगून केली पाच लग्न अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!