अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी अद्यापही मोकाट आहेत. सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीचे विविध सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे.

सैफ अली खानवर हल्ला करुन तेथून पळ काढल्यानंतर आरोपी 7 तासांनी दादारमधील मोबाईलच्या दुकानामध्ये दिसला. यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. आरोपीने दुकानामधून 50 रुपयांच्या इअरफोनची खरेदी देखील केली. आरोपी मोबईलच्या दुकानात गेला आणि म्हणाला, मला इअरफोन हवे आहेत. दुकानदाराने किती रुपयांचा इअरफोन हवे आहे, असे विचारले. त्यावर मला 50 रुपयांवाला इअरफोन हवाय असे सांगितले. त्यानंतर आरोपीने 100 रुपयांची नोट दिली. त्यातील 50 रुपये परत केले, अशी माहिती संबंधित दादरमधील दुकानदाराने दिली.

आरोपी वांद्रे स्थानकावरून दादरला गेला. दादर पश्चिमेला फलाट क्रमांक 1 वर उतरला. त्यानंतर सुविधा हा शोरूम समोरून तेथील जम्बो वडापार येथून पुढे कबुतर खानाच्या दिशेने गेला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी काल रात्री आरोपीचा शोध घेण्यासाठी रेल्वेकडूनही सीसीटिव्ही घेतलेले आहेत. रेल्वे पोलिसही या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत करत आहे.

दरम्यान, आरोपीने सैफ अली खानवर चाकूने सहा वार केले होते. सैफ उपचारानंतर आता चालू लागला आहे. आयसीयूतून त्याला स्वतंत्र रूममध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. 2-3 दिवसांत डिस्चार्जबद्दल विचार केला जाईल. आम्ही सैफला संपूर्ण बेडरेस्टचा सल्ला दिलाय, असेही डॉक्टरांनी सांगितले.

आरोपीचं वर्णन पुढीलप्रमाणे…
अनोळखी पुरुष, अंदाजे वय 35 ते 40 वर्षे, सावळा रंग, सडपातळ बांधा, उंची सुमारे 5 फूट 5 इंच, गडद रंगाचा शर्ट व पॅंट आणि डोक्यावर टोपी.

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…

अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!