पुणे शहरात मराठी व्यावसायिक समूहाची एक कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक…
पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी निवास आणि उपचार व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या मराठी व्यावसायिकांच्या समूहाला एका पंजाबी कुटुंबाने खोटी माहिती देऊन बेकायदेशीर बांधलेली इमारत नोंदणीकृत करार करून भाड्याने दिली. व्यावसायिकांनी व्यवसायासाठी इमारतीमध्ये फर्निचर, अंतर्गत व्यवस्थेकरिता तब्बल एक कोटी ७५ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर विविध प्रकारच्या व्यावसायिक परवान्यासाठी इमारतीची आवश्यक कागदपत्रे मागितल्यानंतर गुंडांना आणून जागेचा ताबा घेतला. […]
अधिक वाचा...पुणे! वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगार सिध्दार्थ गवळी यास जेरबंद केले आहे. सिध्दार्थ गवळी यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करुन शांतता व सुव्यस्थेस गालबोट लावण्यास कारणीभूत ठरत असलेला सराईत गुन्हेगार सिध्दार्थ सोमनाथ गवळी (रा. वारजे माळवाडी, पुणे) यास […]
अधिक वाचा...पुणे शहरातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल; नोकरी गेली म्हणून…
पुणेः पुणे शहरातील वर्दळीच्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री एका युवकाने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य सातपुते (वय ४१) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून, वेळीच मदत मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत होणार पाच नवीन पोलिस ठाणी…
पुणे: पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारत जाणारी उपनगरे लक्षात घेता, गृहमंत्रालयाने पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत 5 नवीन पोलिस ठाणी निर्माण करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. 25 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत या नवीन पोलिस ठाण्यांच्या भौगोलिक सीमाही निश्चित करण्यात आल्या आहेत. पाच नवीन पोलिस ठाणी आणि त्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे… १) मांजरी पोलिस ठाणे: हडपसर आणि […]
अधिक वाचा...पुणे पोलिसाच्या मोबाईलवर आली जाहिरात अन् बँकेतून पैसे गायब…
पुणे: पुणे पोलीस दलातील एका हवालदाराला सायबर भामट्यांनी ७१ हजार रुपयांना गंडा घातला आहे. इन्स्टाग्रामवरील ‘फ्री मध्ये टीव्ही चॅनेल’ या जाहिरातीवर क्लिक करताच मोबाईल हँग झाला आणि काही वेळातच बँक खात्यातून पैसे लंपास झाले. त्यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मुंढवा परिसरात राहणारे तक्रारदार पोलीस हवालदार ११ डिसेंबर रोजी आपल्या दुचाकीवरून घरी […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या…
पुणे: पुणे शहरात कबुतर चोरीच्या संशयावरून एका युवकाला लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडीतील वैदूवाडी परिसरात घडली आहे. रूपेश शिंदे (वय १९, रा. मोशी) असे या मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रूपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे बुधवारी पहाटेच्या सुमारास मोशीकडे जात होते. […]
अधिक वाचा...पुणे-नगर मार्गावर अवजड वाहनांना पुढील पाच दिवस बंदी, कारण…
पुणे : लोणीकंद परिसरात रंगणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून लाखो कुस्तीप्रेमी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. १८ ते २२ मार्च या कालावधीत लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…
पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर येथे युवकाची लोखंडी धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी (ता. १६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील […]
अधिक वाचा...पुणे! छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग…
पुणे: छत्रपती संभाजी महाराजांच्या 337व्या पुण्यतिथीनिमित्त शिरूर तालुक्यातील वढू बुद्रूक येथे मोठ्या संख्येने शिवभक्त मानवंदना देण्यासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 17 मार्चला रात्री 10 वाजल्यापासून ते 18 मार्चला रात्री 10 वाजेपर्यंत वढू बुद्रूक परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…
पुणे : बारामती तालुक्यातील शारदानगर येथून सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यालगतच्या एका विहिरीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा दत्तात्रेय मेमाणे (वय २१) असे या मृत युवतीचे नाव आहे. या घटनेमुळे मेमाणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रतीक्षा ही शिक्षण घेत होती. ९ मार्च रोजी सकाळी ती घरातून बाहेर पडली […]
अधिक वाचा...
