मोठी बातमी! राज्यात ११,००० पदांसाठी होणार पोलिस भरती…
मंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११,००० पदांसाठी पोलिस भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पोलिस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे. गेल्या ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलिस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! महाराष्ट्रात […]
अधिक वाचा...राज्यातील अनेक परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिका-यांच्या बदल्या..
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राज्यातील अनेक परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिका-यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या असून पांढरकवडा येथे परिविक्षाधीन (IPS) राॅबीन बन्सल यांची उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षण (DTP) व सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैद्राबाद येथील प्रशिक्षण पूर्ण करुन महाराष्ट्र संवर्गात रुजू होणाऱ्या खालील तक्त्यातील संदर्भ […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…
मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली असून, पोलिस उपआयुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांची पदोन्नती झाली आहे. गणेश इंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स याठिकाणी पोलिस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली. तर विजय […]
अधिक वाचा...राज्यात ऑक्टोबरमध्ये होणार १० हजार पोलिसांची भरती…
मुंबई : राज्यातील २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंतच्या पोलिस अंमलदारांच्या रिक्त पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे. ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरवात होणार असून, पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. सुरवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; […]
अधिक वाचा...राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या, पाहा नावे…
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. गृह विभागाने 50 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, लातूर, गडचिरोली, भंडारा, अहमदनगर यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलीस अधिकाऱ्यांच्या […]
अधिक वाचा...IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस अधिकारी म्हणून सत्य साई कार्तिक हे कार्यरत आहेत. आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी हातामध्ये तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी त्यांना खुणावत होत्या. क्रिकेटच्या माध्यमातून रणजीपर्यंत मजल मारली. बी. टेक (कॉम्प्यटर सायन्स) होऊन आयटी क्षेत्र खुणावत होते. परदेशात जाऊन एमएस करायचे होते. पण, लहानपणापासून लष्करात दाखल होऊन देशसेवा करण्याचे पाहिलेले स्वप्न आयपीएस […]
अधिक वाचा...पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
पुणे : पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी. अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पोलिस आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना मोठी साथ लाभते ती कुटुंबाची. कुटुंबातील प्रियजनांबाबत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पोलिसकाकाच्या वतीने ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ हे पुस्तक […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये रंगणार महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्यिकांचे संमेलन; पाहा रुपरेषा…
पुणेः नाशिकमध्ये दोन दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्यिकांचे संमेलन 2025 रंगणार आहे. यावेळी राज्यातील विविध भागांमधून साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नियोजन समितीने दिली आहे. पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी. अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पोलिस दलात […]
अधिक वाचा...राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
पुणे : राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यात शैलेश बलकवडे, ए.एच. चावरिया यांच्यासहित अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा नावाचा समावेश आहे. पाहा नावे… ए.एच. चावरिया यांची अमरावती शहराचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून बदली पुणे पोलिस गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची […]
अधिक वाचा...गृह विभागाचा मोठा निर्णय, पोलिस हेड कॉन्स्टेबलही गुन्ह्यांचा तपास करणार…
मुंबई: राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढत्या नागरिकरणावर आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा अपुरी पडत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या आणि अपुऱ्या पोलिस मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलिस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, गृहविभागाने पोलिस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत. यापूर्वी, केवळ पोलिस उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा अधिकार होता. […]
अधिक वाचा...
