राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
मुंबई : राज्याच्या गृह विभागाने भापोसे, रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे. धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. नागपूरच्या राज्य राखीव पोलिस बदल गट क्र. चार […]
अधिक वाचा...राज्यातील पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्याची मागणी…
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीमुळे पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्यात यावी, असे पत्र अप्पर पोलिस महासंचालकांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना दिले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व अंमलदार […]
अधिक वाचा...पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल…
मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने महत्वाचा निर्णय घेतला असून, पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल केला आहे. नवी मुंबई पोलिस मुख्यालय येथे 15 ते 17 एप्रिल रोजी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडणार आहे. मात्र, लोकसभा निवडणूक पाहता 19, 26 आणि 27 एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल […]
अधिक वाचा...मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…
मुंबई : राज्य शासनाने 17 हजार 471 पोलिसांची भरती करण्यासाठी जी जाहिरात काढली त्यात 10 टक्के मराठा आरक्षण देखील लागू राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाची अमलबजावणी देखील सुरु झाली आहे. त्यामुळे पोलिस भरतीत देखील हे 10 टक्के आरक्षण मराठा समाजातील […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…
मुंबई : मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणाचा शासन निर्णय होताच गृह विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकूण १७ हजार पोलिस पदांची (चालक व शिपाई) भरती काढली आहे. ५ ते ३१ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. राज्यातील विविध शहर-जिल्ह्यांची वाढलेली लोकसंख्या व विस्तार, गुन्हेगारीतील वाढ, नवीन पोलिस ठाण्यांचे प्रलंबित प्रस्ताव, सध्याची सामाजिक स्थिती या पार्श्वभूमीवर गृह […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टीवर बंधने…
पुणे : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर त्यांना दिले जाणारे निरोप समारंभ व फेटे बांधून जीपमधून त्यांची मिरवणूक काढणे या गोष्टी यापुढील काळात करता येणार नसून, अशा स्वरूपाचे कृत्य घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिला आहे. याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. प्रसिद्ध पत्रकात रश्मी शुक्ला यांनी नमूद केले आहे की, […]
अधिक वाचा...Video: नाशिकमध्ये ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप!
नाशिक : महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील सर्वोत्तम पोलिस दल असून, पोलिस दलाचा इतिहास गौरवशाली आहे. एखाद्या पोलिसाकडून चुकीचे कृत्य घडले तर पोलिस दलाला टीकेला सामोरे जावे लागते. पोलिसांनी अशावेळी आपली शपथ निभवण्यासाठी आपले पोलिस दल समाजभिमुख कसे होईल, यासाठी योगदान द्यावे. शासक नव्हे तर जनसेवक म्हणून पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन राज्याचे […]
अधिक वाचा...अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!
पुणेः वरिष्ठ पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांची शासनाने नुकतीच अपर पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नती देऊन सीआयडी क्राईम, पुणे येथे नियुक्ती केली आहे. यामुळे पोलिस दलासह विविध क्षेत्रांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अशोक इंदलकर 1992-93 बॅचचे अधिकारी आहेत. पोलिस उपनिरीक्षक म्हणून ते पोलिस दलात रुजू झाले होते. मुंबई पुणे, कोल्हापूर नागपूर, अमरावती या ठिकाणी त्यांनी […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ : संदिप कर्णिक
नाशिक: खेळाडूंना खेळातून आपले कौशल्य, नैपुण्य दाखविण्याची संधी असते. शिवाय, आपली शारीरिक तंदुरुस्तीही सिद्ध होत असते. खेळातून खेळाडूवृत्तीही विकसित होत असते. त्यादृष्टीने राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये पोलिस खेळाडूंनी खेळावे. नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना आज पासून (रविवार) प्रारंभ होत आहे, असे नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सांगितले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर […]
अधिक वाचा...राज्यात होणार 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती: गृहमंत्री
नागपूर : राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) विधानपरिषद लक्षेवेधीवेळी दिली. गृह विभागातील पोलिस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात 23 हजारांपेक्षा […]
अधिक वाचा...
