वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहे. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे. वाल्मिक कराड याला साथ देणारे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरंपच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या 9 डिसेंबर रोजी करण्यात […]
अधिक वाचा...वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला आणि सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याचे कारनामे पुढे येताना दिसत आहेत. वाल्मीक कराड याचा एक कारनामा खंडणी प्रकरणातील समोर आला आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी […]
अधिक वाचा...बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड : बीड पोलिसांनी 2024 या वर्षातील जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारीच शेअर केली आहे. त्यानुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बीड पोलिस दल कारवाईच्या बाबतीत सरस ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे गुन्हे दाखल झाले असून, 191 हे खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, गुन्ह्याची उकल करण्यात पोलिस यंत्रणा सरस […]
अधिक वाचा...बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
बीड: बीड शहरातील पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली आहे. अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआंबा ता.केज जि बीड) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मस्साजोग गावचे सरपंच संतोष […]
अधिक वाचा...सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. दोघांच्या अटकेनंतर संतोष देशमुख खून प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी सुदर्शन घुले आसरा घेण्यासाठी भिवंडीत आला होता. पण त्याला आसरा न मिळाल्याने त्याने थेट गुजरातला पलायन केल्याची माहिती […]
अधिक वाचा...बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
बीड: बीडचे नवीन पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलिस दलातील चार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. पोलिस दल आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही […]
अधिक वाचा...सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळे याला पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय, हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या आणखी एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे एकूण तिघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना […]
अधिक वाचा...वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीसांचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर सरेंडर केले होते. पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे असे तीन आरोपी फरार होते. त्यांच्या मागावर देशभर पोलीस पथकं रवाना झाली होती. आता यातील एका […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
बीड: सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या प्रकरणातील विष्णू चाटे याने दिलेल्या माहितीनंतर वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, वाल्मिक कराड याचे अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे चाटे यानी कबुली दिली आहे. सीआयडीने न्यायालयात […]
अधिक वाचा...संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुधवारी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठित करण्यात आली. या एसआयटी समितीमध्ये 10 जणांचा समावेश आहे. पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे या एसआयटी समितीचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. एसआयटी पथकात बीड […]
अधिक वाचा...
