
Video: पुणे पोलिस दलातील ‘मार्शल’ ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशनच्या मार्शल अंमलदारांनी गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. पोलिस अंमलदार निकम आणि राक्षे यांनी दाखवलेली तत्परता आणि योग्य वेळी दिलेल्या ‘सीपीआर’मुळे (CPR) एका कुटुंबाचा आधार वाचला असून, पुणे पोलिस दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
View this post on Instagram
कोंढवा मार्शलचे पोलिस अंमलदार पीसी ९७२९ निकम आणि पीसी ४४१ राक्षे यांना मिठा नगर परिसरातून एका घरगुती भांडणाचा तातडीचा कॉल प्राप्त झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून हे दोन्ही अंमलदार तातडीने घटनास्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना कॉलर यास्मिन तांबोळी यांनी सांगितले की, त्यांचे पती साजिद तांबोळी यांनी वादातून स्वतःला बेडरूममध्ये बंद करून घेतले आहे. पोलिसांनी बेडरूमच्या दरवाजाबाहेरून साजिद यांना अनेकदा आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी विपरीत घडल्याची शंका आल्याने निकम आणि राक्षे यांनी क्षणाचाही विलंब न लावता बेडरूमचा दरवाजा तोडला.
बेडरूमचा दरवाजा उघडताच समोरचे दृश्य धक्कादायक होते. साजिद यांनी छताच्या पंख्याला गळफास लावून घेतला होता आणि ते लटकलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी तत्काळ त्यांना खाली उतरवले. त्यावेळी साजिद यांची हालचाल थांबली होती आणि ते बेशुद्ध पडले होते. मात्र, आशा न सोडता पोलिस अंमलदारांनी त्यांना तातडीने सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) देण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले आणि साजिद काही वेळातच शुद्धीवर आले. प्राथमिक जीवदान मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
दरम्यान, वेळेवर पोहोचून, प्रसंगावधान राखून दरवाजा तोडणे आणि वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी स्वतः सीपीआर देऊन जीव वाचवणे, या मार्शल अंमलदारांच्या कार्यामुळे पुणे पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी देखील या दोन्ही अंमलदारांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…
पुणे! मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली; बियर अन् सिगारेटची पार्टी केली अन् 4 तास हत्येचा थरार…
पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी मांडलाय अक्षरशः उच्छाद…
पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…

