अजित पवार यांची सावलीही अनंतात विलीन; विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार…

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण बुधवारी (ता. २८) अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता. फलटण तालुक्यातील तरडगाव या त्यांच्या मूळगावी काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. ते मागील काही वर्षांपासून अजित पवार यांचे पीएसओ म्हणून काम करत होते. अजित पवार कुठेही गेले तरी त्यांच्या जीवाची रक्षा करण्यासाठी विदीप जाधव सावलीसारखे त्यांच्यासोबत असायचे. त्यामुळे त्यांना अजित पवार यांची सावली म्हटले जायचे. पण बुधवारी झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

विदीप जाधव यांचे पार्थिव बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तरडगावच्या पालखी स्थळावर आणण्यात आले. याठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तरडगाव मध्ये रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढून अंत्यविधी पार पाडण्यात आला. यावेळी त्यांना पोलिसांनी हवेत गोळीबार करत त्यांना मानवंदना दिली. विदीप जाधव यांच्या जाण्याने पोलीस दल, कुटुंबीय आणि त्यांचा मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

दादा मिश्किलीने म्हणाले, ‘आयला गडबड झाली, आता चोरांना पॉश लॉक अप…

अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा विमान अपघातात मृत्यू; ओळख पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!