पुणे शहरात वाहतूकीत प्रायोगिक तत्वावर बदल; जाणून घ्या,पर्यायी मार्ग कोणते…

पुणे : पुणे महापालिकेकडून कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे.

साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल हा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून सुमारे ५० वर्षापूर्वी बांधण्यात आलेला असून सद्यस्थितीत सदरचा पूल हा कमकुवत झाल्याने पुणे महानगरपालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूस हाईट बॅरीअर टाकून सदरील पूल जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

असा असेल बदल…
1. पर्णकुटी चौक ते ब्ल्यु डायमंड चौक ते मोबोज चौक असा एकेरी मार्ग असेल.
2. मोबाज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रोड) असा एकेरी मार्ग असेल.
3. अलंकार चौक ते आय.बी. चौक ते सर्कीट हाऊस चौक ते मोरओढा चौक असा एकेरी मार्ग असेल.
4. मोर ओढा चौक ते कौन्सिल हॉल चौक असा एकेरी मार्ग असेल.

वरील सर्व मार्गावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या जड, अवजड, मल्टीअॅक्सल वाहनांना २४ तास बंदी असेल

– काहुन रोड जंक्शन ते तारापुर रोड जंक्शन हा रस्ता पुर्वी प्रमाणेच एकेरी मार्ग राहील.
– कॉन्सील हॉल चौक ते साधु वासवानी पुतळा मार्ग एकेरी करण्यात येत आहे.

नगर रस्त्याकडून आल्यास…
नगर रोडवरुन मोर ओढा चौकाकडे जाणारी वाहने :- पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, ब्ल्यु डायमंड चौक,
उजवीकडे वळण घेवून मंगलदास रोडने मोबोज चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौकी समोरुन पुन्हा डावीकडे वळण घेवून आय.बी. (रेसीडेन्सी क्लब) चौक, डावीकडे वळण घेवून सर्किट हाऊस चौक मार्गे मोर ओढा चौकाकडे जाऊ शकतील.

कोरेगाव पार्ककडे जाण्यासाठी : मोर ओढा चौकातून सरळ कौन्सिल हॉल चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्क जाऊ शकतील.

पुणे स्टेशन येथुन कोरेगांव पार्ककडे जाणारी वाहने पुणे स्टेशन, अलंकार चौक, डावीकडे वळण घेवून जहाँगीर चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, पुणे स्टेशन, अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्ककडे जाऊ शकतील.

पुणे स्टेशन ते घोरपडीकडे जाणारी वाहने पुणे स्टेशन ते अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, सरळ सर्कीट हाऊस चौक मार्गे मोरओढा चौक मार्गे पुढे जाऊ शकतील.

घोरपडी व भैरोबानाला चौकामधुन येणाऱ्या सर्व बसेस (पी.एम.पी.एम.एल. सह) मोरओढा चौकाकडुन सरळ जावून काहुन रोड जंक्शन वरून डावीकडे वळण घेवून तारापूर रोड जंक्शन वर येतील व उजवीकडे वळण घेवून तारापूर रोडने ब्लु नाईल चौकाकडुन उजवीकडे वळण घेवून कॉन्सील हॉल चौकामधुन पुढे जातील. तर आय.बी. जंक्शन ते मोरओढा हा एकेरी मार्ग आवश्यक त्यावेळेस तात्पुरता दुहेरी करण्यात येईल. तर ब्लु डायमंड चौक ते साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क कडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे राहील.

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!