
स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
स्मार्तना पाटील या गेल्या २० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरात सध्या त्या पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. सातारा जिल्ह्यातील कराडजवळ असलेल्या खेडेगावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. सातारा जिल्ह्यात १९९६ साली सर्व शासकीय प्रमुख पदांवर महिला अधिकारी कार्यरत होत्या. संबंधित वृत्त टीव्हीवर ऐकले आणि आपणही असेच काही तरी व्हावे असा निर्णय घेतला. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी घातली. त्यांच्या यशस्वी वाटचालीविषयी थोडक्यात…
स्मार्तना पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराडजवळील बनवडी गावात झाला. प्राथमिक शिक्षण गावात, तर पुढील शिक्षण कराडमध्ये झाले. शाळेमध्ये नेहमीच वरच्या क्रमांकावर राहिल्या. वडील प्रोफेसर, तर आई गृहिणी. तिघी बहिणी. तिघीही शिक्षणात हुशार. स्मार्तना यांनी मेडिकल क्षेत्रात जावे, अशी वडिलांची इच्छा. महात्मा जोतिबा फुले यांचे स्वप्न १०० वर्षांनी सातारा जिल्ह्यात पूर्ण झाले होते. १९९७ ला सातारा जिल्ह्यात सर्व वरिष्ठ पदावर महिला अधिकारी होत्या. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जेल अधिकारी महिला होत्या. जागतिक महिलादिनी टीव्हीवर वृत्त ऐकले आणि एमपीएससी, यूपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. प्रचंड मेहनत, जिद्दीच्या जोरावर ते सत्यात उतरवले.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण…
ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतच होते. स्मार्तना पाटील यांचेही शिक्षण जिल्हा परिषदेच्याच शाळेत झाले. मराठी माध्यमातून. एका मंदिरात वर्ग भरायचे. पहिली, दुसरी आणि तिसरीचे विद्यार्थी एकत्रच बसायचे आणि त्यांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक असायचे, अशा पद्धतीने प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाले, तर पुढील शिक्षणासाठी त्या कराडला आल्या.
गावची पाटीलकी आणि सुशिक्षित घराणे…
गावच्या पाटील घराण्यातील जन्म. यामुळे लहानपणापासून चालीरीती आणि संस्कार मिळाले. वडील रसायनशास्त्राचे प्राध्यापक, तर आई गृहिणी. सुशिक्षित कुटुंबातून त्या पुढे आल्या. खेडेगावात वाढल्यामुळे लहानपणापासूनच डॅशिंग हा गुण अंगवळणी पडला होता. उचापती करण्याबरोबरच चॅंलेज स्वीकारत होत्या. पुढे त्याचा मोठा फायदा झाला. शिवाय, दहावी-बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले.
मुलगा असता तर बरं झालं असतं…
स्मार्तना पाटील यांच्या कानावर लहानपणापासून शब्द पडायचे. त्यांच्या आई-वडिलांना लोकं म्हणायचे की, तुम्हाला मुलगा असता तर बरं झालं असतं. पण, हेच वाक्य स्मार्तना यांना नेहमी खटकायचे. पण, याच वाक्यामुळे त्यांनी मनात एक जिद्द बांधली की, मी असे काहीतरी करेन की जी इतरांची मुलं करणार नाहीत. माझ्या कर्तृत्वाने आई-वडिलांना अभिमान तर वाटेलच, पण इतरांनाही अभिमान वाटेल. पण, काय बनायचे ते त्या वेळेला माहीत नव्हते. पुढे त्यांनी जिद्दीच्या जोरावर पोलिस अधिकारी होऊन आई-वडिलांना अभिमान वाटेल असे यश प्राप्त केले.
वडिलांची इच्छा एमबीबीएसची…
दहावी-बारावीला चांगले गुण मिळाले होते. एमबीबीएस व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. पण, स्मार्तना यांची इच्छा नव्हती. पुढे बीफार्मसीला प्रवेश घेतला. पण, मनात काही तरी वेगळे करण्याचा विचार यायचा. सातारा जिल्ह्यात १९९६ साली महात्मा जोतिबा फुले यांचे स्वप्न पूर्ण झाले होते. सर्व महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी होत्या. टीव्हीला हे वृत्त ऐकले होते. आपणही असे काही करू शकलो तर? हे वृत्त डोक्यात घोळू लागले. पण, या पदांपर्यंत कसे पोहोचायचे? याबद्दल काहीच माहिती नव्हती. जागतिक महिला दिनानिमित्त कराडला मुक्त व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर या उपस्थित होत्या. स्मार्तना पाटील यांनी तेथे भाषण केले. मीरा बोरवणकर यांनी शाबासकी दिली आणि त्याच क्षणी ठरवले, की पोलिस क्षेत्राकडेच वळायचे आणि अधिकारी बनायचे.
स्पर्धा परीक्षेसाठी घरातून बाहेर…
बी.फार्मसी झाले होते. पण, अधिकारी होण्याची जिद्द होती. त्यासाठी एमपीएससी, यूपीएससीची परीक्षा देणे महत्त्वाचे होते. घरच्यांच्या थोडंसं मनाविरुद्ध जाऊन त्या घराबाहेर पडल्या. स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. दोन वेळच्या जेवणासाठी जवळ पैसे नसायचे. यामुळे दोन पेपरच्या मध्ये एक सफरचंद खाऊन एक वेळचे जेवण घेत. घरातून बाहेर पडताना एकच ठरवलेले की, घरी परत येईन ते काही तरी घेऊनच येईन. पुणे शहरात राहून रात्रंदिवस अभ्यास सुरू केला, कारण अस्तित्वाचा प्रश्न होता. मोठ्या सन्मानाने घरी जायचे होते, हा मनात ध्यास होता. किरण बेदी यांचे शब्द आठवायचे, ‘आत्ताची लाइफ एन्जॉयमेंट सोडून तुमचं कर्तव्य केलं, कष्ट केलं तर भविष्यातील प्रत्येक दिवस हा तुमचा एन्जॉयमेंटचा असेल,’ अशी काही वाक्य मनावर कोरली गेली होती. यामुळे झोकून देऊन अभ्यास करू लागल्या.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

