
पुणे-नगर मार्गावर अवजड वाहनांना पुढील पाच दिवस बंदी, कारण…
पुणे : लोणीकंद परिसरात रंगणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून लाखो कुस्तीप्रेमी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. १८ ते २२ मार्च या कालावधीत लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्चपासून २२ मार्चपर्यंत दररोज दुपारी दोन ते रात्री अकरा या वेळेत ही बंदी लागू राहील. यामध्ये ट्रक, खासगी आराम बस, जेसीबी, रोडरोलर आणि ट्रॅक्टर यांसारख्या सर्व अवजड वाहनांचा समावेश आहे. केवळ मुख्य रस्त्यावरच नाही, तर या परिसरातील उपरस्त्यांवरही अवजड वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा असल्याने प्रचंड गर्दी होण्याचा अंदाज आहे. लोणीकंद ते खराडी या पट्ट्यात वाहतूक सुरळीत राहावी आणि कुस्तीप्रेमींना वेळेत पोहचता यावे, यासाठी हे विशेष नियोजन करण्यात आले आहे. अवजड वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणेकरांच्या गाड्यांना आता ‘तीन अक्षरी’ नंबरप्लेट! MH-12 ऐवजी…
वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना मोजावी लागणार मोठी किंमत…
पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; दंड न भरल्यास थेट…
FASTag बाबत मोठा निर्णय; पाहा नवे नियम कधीपासून लागू…
वाहनाच्या Number Plate वरून कशी मिळवाल मालकाची माहिती…
HSRP Number Plate नसेल तर किती भरावा लागेल दंड…

