
शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
शशिकांत बोराटे हे गेल्या १६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. शेतकरी कुटुंबातील जन्म. मुलाने अधिकारी व्हावे, ही वडिलांची इच्छा. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून डीवायएसपीची परीक्षा पास झाले. कृषिसेवकाची नोकरी सोडून वयाच्या २७व्या वर्षी ते पोलिस दलात दाखल झाले आहेत. सध्या पुणे शहर पोलिस दलात ते पोलिस उपायुक्त (मुख्यालय) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात…
शशिकांत बोराटे यांचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काटी हे गाव. एकत्र शेतकरी कुटुंबातील जन्म. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम. वडील जुन्या काळातील मॅट्रिक पास. पण, काही कारणामुळे नोकरी करता आली नाही. पण, आपल्या मुलाने उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर किंवा अधिकारी बनावे, अशी वडिलांची इच्छा. कुटुंबामध्ये कोणीही पोलिस अधिकारी नसताना शशिकांत बोराटे यांनीसुद्धा रात्रंदिवस अभ्यास करून आईवडिलांचे स्वप्न साकार केले आहे. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी धडाकेबाज कारवाया केल्या आहेत.
शिक्षण…
१ ते ४ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटी, ता. इंदापूर, जि. पुणे
५ ते १० – काटेश्वर विद्यालय, काटी
११ ते १२ – सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज (जि. सोलापूर)
बी.एसस्सी अॅग्री – कृषी विद्यालय, पुणे
एमएसस्सी अॅग्री – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर
परिस्थितीवर मात…
शशिकांत बोराटे बारावीनंतर शिक्षण घेण्यासाठी पुणे शहरात दाखल झाले होते. त्यांना कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव तर होतीच, शिवाय पैशांची बचत करण्याबरोबरच काटकसर हा गुण अंगीकारला होता. पुणे शहरात प्रवासादरम्यान बसचे पैसे वाचावेत म्हणून पायी चालत प्रवास करायचे. पुणे शहरातून गावाला जाताना पैसे वाचविण्यासाठी ट्रकमधून प्रवास करत. त्यांना यामागे होती परिस्थितीची जाणीव. पण, ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत आणि अभ्यास करून यश खेचून आणले आहे.
कृषिसेवक म्हणून नोकरी…
एमएसस्सी अॅग्री ही पदवी हाती आल्यानंतर वयाच्या २४व्या वर्षी नोकरी करणे आवश्यक होते. स्वतःबरोबरच कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे महत्त्वाचे असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने कृषिसेवक म्हणून २००४ साली सुरुवात केली. कामाचे ठिकाण होते बीड जिल्ह्यातील गेवराई. वेतन होते २५०० रुपये. स्वतःसाठी एक हजार रुपये ठेवून दीड हजार रुपये घरी पाठवत. तीन वर्षे कृषिसेवक म्हणून काम केले.
दगड घेऊन पाठीमागे लागला अन्…
कृषिसेवक म्हणून काम करत असताना महाराष्ट्र शासन फळबाग योजनेसाठी एका गावात जाण्याची वेळ आली होती. एक दुचाकीवरून सहकाऱ्यासोबत गावात पोहोचले. गावातील एका व्यक्तीला योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे तो चिडला होता. दगड घेऊन तो दोघांच्या मागे लागला. दोघे वेगवेगळ्या दिशेने पळाले. शशिकांत बोराटे यांनी दुसऱ्या क्षणी विचार केला, की दगड घेऊन पाठीमागे लागणार नाही, अशी नोकरी करायची. खरं तर त्या व्यक्तीमुळे आयुष्याला कलाटणी मिळाली. नकारात्मक गोष्ट सकारात्मक घेण्याच्या स्वभावाचा फायदा झाला. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पोलिस अधिकारी होण्याचे ठरवले आणि होऊन दाखवले.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…