
मुंढवा पोलिस स्टेशनच्या वतीने रूट मार्च…
पुणे (संदीप कद्रे): मुंढवा पोलिस स्टेशन चे वतीने शुक्रवारी (ता. १९) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला होता. या रूट मार्चमध्ये तीन अधिकारी व २५ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली.
मुंढवा पोलिस स्टेशन चे वतीने पोलिस स्टेशन हद्दीमध्ये 22 जानेवारी श्री राम जन्मभूमी कार्यक्रमाचे अनुषंगाने व विविध राजकीय घडामोडी च्या अनुषंगाने रूट मार्च काढण्यात आला. सदरचा रूट मार्च हा जय हिंद चौक घोरपडी, विकास नगर, बालाजी नगर, निगडे नगर ,महाराष्ट्र बँक ,देवकी पॅलेस चौक, पुन्हा फिरून जय हिंद चौक चौक येथे संपविण्यात आलेला आहे. सदर रूट मार्च करता आम्ही स्वतः तसेच पोलिस निरीक्षक गुन्हे श्रीमती रोकडे 03 अधिकारी व 27 पोलिस अंमलदार उपस्थित होते, असे महेश बोळकोटगी यांनी सांगितले.
दरम्यान, मुंढवा पोलिसांनी काढलेल्या रूट मार्चने नागिरकांचे लक्ष वेधले होते. नागरिक उभे राहून पोलिसांकडे पाहून त्यांचे स्वागत करताना दिसत होते.
पोलिसांनी पत्रकारांना रोखू नये: अजित पवार
राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द; पत्रकात म्हटले की…
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…
मुंढवा पोलिसांनी फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया…
पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

