पुणे! अपघात बघणाऱ्यांचा काळजाचा थरकाप उडाला…

पुणे: सुस-नांदे रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली चिरडून युवतीचा जागीच मृत्यू झाला. अंजली शंकर साळवे (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोडने जात होती. ती शिवबा चौकाजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका सिमेंट मिक्सरने तिला धडक दिली. धडक लागताच अंजलीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती खाली पडली. ती थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात बघणाऱ्यांचा काळजाचा थरकाप उडाला.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

या प्रकरणी बावधन पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने कारवाई केली आहे. पोलिसांनी ट्रक चालक राजपाल कसबे याला तातडीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, केवळ चालकावर कारवाई करून न थांबता, सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ‘सूर्या कन्स्ट्रक्शन’चे मालक गणेश कलशेट्टी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…

पुणे! जेजुरीजवळ भीषण अपघातात 7 जण जागीच ठार; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!