Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

श्रीनगर (जम्मू काश्मीर): पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे.

दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी कोणत्या धर्माचे आहेत, अशी विचारणा केली. तसेच काही पर्यटकांना दहशतवाद्यांनी पँटही काढायला सांगितली, त्यानंतर गोळ्या झाडल्या, अशी संतापजनक माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत.

महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू…
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील मृतांची नावे…
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल

जखामींची नावे..
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!