
भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या…
जळगाव : माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धावत्या गाडीवर केलेल्या गोळीबारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला. यात दोघांनाही गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले होते. भुसावळ शहरातल्या जळगाव नाका मरी माता मंदिराजवळ ही घटना घडली आहे. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने भुसावळ शहर हादरले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी केली. भूसावळ शहरात तणावाचे वातावरण असून घटनास्थळी मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून अधिकारी पत्नीची केली हत्या…
सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…
नाशिक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर दरोडेखोरांकडून गोळीबार…
नांदेडमध्ये पाठलाग करताना आरोपींनी केला पोलिसांवरच गोळीबार…
गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

