क्रिकेटपटूची बहिण आणि मेव्हण्याचा फायनलसाठी येताना झाला अपघतात मृत्यू अन् चिमुकले…

अहमदाबाद (गुजरात): आययसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी भारताचा फलंदाज इशान किशन याच्या चुलत बहीणीचं आणि तिच्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झाले आहे. याबाबत सामना संपल्यानंतर स्वत: इशान किशनने माहिती दिली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनल खेळवली गेली. मात्र, याचवेळी इशान किशनवर दु:खाचा डोंगर कोसळला. फायनल मॅच पाहण्यासाठी अहमदाबादसाठी येत असताना ईशान किशन याच्या चुलत बहिणीचा आणि मेहुण्याचा मृत्यू झाला. फायनलच्या अगदी आधी मी माझ्या चुलत बहिणीला कार अपघातात गमावलं, ज्यामुळे मी खुप दु:खी होतो. मी तिच्यासाठी खेळलो, याची कल्पना मी हार्दिक पांड्याला दिली. मी हार्दिक पांड्याशी बोललो आणि त्यांनी संघाला पुढे ठेवण्यास सांगितले. मी हा विजय मी माझ्या बहिणीला समर्पित करतो आणि आज महिला दिन आहे, त्यामुळे तो अधिक खास बनतो, असे इशान किशन म्हणाला.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

इशान किशनचे वडील वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी येणार होते. पण मॅच पाहण्यासाठी येत असताना इशानच्या चुलत बहिणीच्या कारचा अपघात झाला. त्याच त्याचा भाचा आणि भाची थोडक्यात बचावले आहेत. या अपघातामध्ये जोडप्याची सहा महिने आणि 3 वर्षांची दोन मुलं वाचली. ‘आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे. इशानला त्यांना भेटायला जायचं होतं, पण फायनलमुळे तो परत येऊ शकला नाही. तो पूर्णपणे अस्वस्थ आहे,’ असे प्रणव पांडे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुलाचा खेळ पाहण्याऐवजी इशान किशनचे वडील सिलिगुडीतील एका शवगृहात बसले होते. या अपघातामध्ये जोडप्याची सहा महिने आणि 3 वर्षांची दोन मुलं वाचली. ‘आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, इशानने हिंमत हारली नाही अन् त्याने हिमतीने खेळ दाखवला अन् टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

रत्नागिरीच्या क्रिकेटपटूचा रन काढताना हृदयविकाराने मृत्यू…

Video: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ आला समोर…

क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी…

क्रिकेटपटूने दोन खणखणीत चौकार मारले अन् घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!