
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
पुणे (संदिप कद्रे): विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ९) घडली आहे. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
सतिश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मात्र पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. पण पोलिसांना सतिश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. पुण्यापासून ३७ किलोमीटर लांब असलेल्या शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हत्या कशी झाली, याची प्राथमिक माहिती दिली आहे.
पुण्याचे पोलिस उपायुक्त ए राजा यांनी सांगितले की, सतीश वाघ यांच्या शरीरावर दांड्याने मारल्याचा खुणा आढळल्या आहेत. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. शिवाय अपहरणानंतर सकाळीच वाघ यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, ‘सतिश वाघ हे साधे शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबियांकडू माहिती घेतली पण त्यांचे कोणाशी वाद नव्हते. आर्थिक व्यवहार पण कोणाशी नव्हते. विविध गोष्टींच्या माध्यमातून तपास सुरू आहे.’
दरम्यान, आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ सोमवारी सकाळी मॉर्गिंन वॉकला गेले होते. यावेळी पुण्यातल्या शेवाळवाडी परिसरातून त्यांचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. साधारण साडे आठ वाजता हा तपास सुरू झाला होता. गुन्हे शाखेला सकाळी 9 वाजता टीम रवाना करण्याचे आदेश देण्यात आले होते. साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या 12 टीमने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर सीसीटीव्ही आणि टॅावर लोकेशनच्या मदतीने तपास सुरू 12 वाजता झाला. त्यानंतर तीन वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.
सतिश वाघ यांचा शोध सुरू असताना संध्याकाळी सहाच्या सुमारास उरूळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. हडपसर पोलिस आणि गुन्हे शाखेचे पोलिस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर आठ वाजेच्या सुमारास आयकार आणि फॅारेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळी रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळल्याची माहिती आहे. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून केला? याची माहिती अद्याप समोर आली नाही. हत्येच्या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

