वडापाव पाहून चिडले अन् काचेची बरणी मारली फेकून…

पुणे: बालेवाडी परिसरातील एका स्नॅक्स सेंटरमध्ये वडापाव विक्रेत्याने गार वडापाव दिल्यामुळे चिडलेल्या ग्राहकाने आणि त्याच्या दोन मित्रांनी थेट स्नॅक्स सेंटर मधील विक्रेत्याला मारहाण केली. तिघांनी विक्रेत्याला काचेची बरणी फेकून मारत तोडफोड केल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय 45, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश कोंडिबा ढेबे (वय 23) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर देखील मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी यांचे बालेवाडी परिसरातील साई चौकात शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. त्या ठिकाणी दुपारीच्या सुमारास अंकुश कोंडिबा ढेबे आणि त्याचे दोन मित्र स्नॅक्स सेंटरवर आले होते. त्यांनी वडापाव मागितला. वडापाव दिल्यानंतर तो गार आहे, यावरून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील चहाचे थर्मास खाली फेकून तो फोडला. अंकुश कोंडिबा ढेबे याने काउंटरवरील काचेची बरणी हातात घेऊन ती प्रकाशचंद्र जोशी यांच्या दिशेने फेकून मारली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. बाणेर पोलिस तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात फॉर्च्युनर गाडीमधील रोकड जप्त…

पुणे शहरात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह…

पुणे शहरात अट्टल घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस पोलिसांनी केली अटक…

पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…

प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!