बांधकाम व्यावसायिकाची जाळून हत्या; मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलात…

छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिकाची जाळून हत्या करण्यात आली असून, त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलात आढळून आला आहे. किशोर बाबुराव लोहकरे असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी या बांधकाम व्यावसायिकाच्या चालकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

बांधकाम व्यावसायिक किशोर बाबुराव लोहकरे यांची पेट्रोल टाकून जाळून हत्या करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील गोडवा गावातील जंगल परिसरात आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी त्यांचा चालक जावेद सत्तार शेख याला अटक केली आहे. हत्येचे कारण समजू शकलेले नाही.

किशोर बाबुराव लोहकरे यांनी 17 सप्टेंबर रोजी मुंबई येथे जात असल्याचे पत्नीला सांगितले. शिवाय, घरातून 10 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीचा चालक जावेद सत्तार शेख हा होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलामध्ये आढळून आला आहे. जाळून त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात त्यांच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! कोमातून बाहेर आलेल्या माथेफिरूने केली २२ सेंकदात शरीराची चाळणी…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलिस कोठडी…

प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं…

धक्कादायक! अहमदनगर जिल्ह्यात दिराने केली दोन वहिनींची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!