
विकृती! प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करायचा अन् विकायचा फळं…
ठाणे : एका फळ विक्रेता एका प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करून, त्यानंतर तो हात न धुता, त्याच हातांनी ग्राहकांना फळं विकत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये फळ विक्रेत्याचे घृणास्पद कृत्य उघडकीस आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीत लघवी केल्यानंतर आरोपी फळविक्रेता हात न धुता फळे विकत होता. लघवी केल्यानंतर त्याने ती बॅगही गाडीवर ठेवली. त्याच्या या गैरकृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
डोंबिवलीतील निलजे परिसरात एका फळ विक्रेत्यानं प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करून त्याच हाताने ग्राहकांना फळं विकण्यास सुरुवात केली. या फळ विक्रेत्याचा लघवी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फळ विक्रेत्याचे हे घृणास्पद कृत्य उघडकीस आल्यानंतर मानपाडा पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी करून फळ विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अली खान (वय २०) असे फळ विक्रेत्याचं नाव आहे. हा व्हिडीओ निलजे भागातील आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 271 (धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता, निष्काळजीपणा), 272 आणि 296 (अश्लीलता) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…
विकृती! नाशिक जिल्ह्यात भररस्त्यात गायीवर अत्याचार…
विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…
विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…
विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

