Video: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ आला समोर…

मुंबईः भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावली असून त्याला नीट चालता येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पहिला व्हिडिओः

 

Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दुरावस्था; चालताही येईना…

मुंबईत एका दुकानबाहेर विनोद कांबळी दुचाकीला धरून उभा होता. त्याला नीट उभं राहता येत नव्हतं. त्याचे पाय डगमगत होते. त्याला रस्त्याच्या फुटपाथवर लोकांनी मदत करत कसे बसे नेले. त्यानंतर विनोद कांबळीच्या तब्येतीची चिंता चाहत्यांना वाटू लागली आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद कांबळीच्या जवळच्या मित्रांनी त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी भेट दिली. त्याचा शाळेतील वर्गमित्र रिकी आणि मॉर्कस त्यांनी विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दलचा दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. पत्रकार रामेश्वर सिंह यांनी कौटो बंधू आणि विनोद कांबळीच्या भेटीचा एक व्हिडीओ आणि फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये मित्रांना भेटून विनोद कांबळी आनंदी आणि मस्तीचा मूडमध्ये आहे. विनोद कांबळीच्या मित्रांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा जुना आहे. आम्ही त्याला भेटल्यावर जुनी हिंदी गाणी ऐकली. 1990 मधील वेस्ट इंडिज मॅचच्या आठवणीला उजाळा दिला. शेन वॉर्नचा सामना त्याचा खेळीबद्दल आम्ही बोललो. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्ही मजा करतो, असेही ते म्हणाले आहेत.

मित्र म्हणाला, विनोद कांबळी याचे वय 52 वर्षांचे आहे. तर दुसरीकडे सचिन तेंडुलकरने त्याला आर्थिक मदत करण्याच आवाहन केले आहे. विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल बोलायचं झालं तर ह्रदयविकारासह डिप्रेशनचाही त्रास त्याला झाला होता. अनेक वेळा तो हॉस्पिटलमध्ये दाखलही झाला होता. पण, सध्या त्याची प्रकृती चांगली आहे.’

दुसरा व्हिडिओः

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…

प्रेम, लव्ह मॅरेज अन् प्रेमसंबंध! दादर सूटकेस प्रकरणात पत्नीला अटक…

हृदयद्रावक! कुत्रा चिमुकलीच्या अंगावर आदळल्याने मृत्यू तर कुत्रा…

Video: मोबाईल चोराला मिळाले पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!