पुणे शहरात पालखी सोहळ्यासाठी पाच हजार पोलिस तैनात…

पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (ता. ३०) पुणे शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही, वॉच टॉवर राहणार असून गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत.

श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (ता. २८) प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. २९) प्रस्थान होणार आहे. रविवारी (ता. ३०) दोन्ही पालख्या पुणे शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळा रविवारी आणि सोमवारी शहरात मुक्कामी असणार आहे. मंगळवारी (ता. २५) पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे.

नाना पेठेतील श्री निवडु्ंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आणखी करण्यात आली असून सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात राहणार आहे.

पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…

पुणे शहरात महिलांना लक्ष करून लुटणाऱ्या सराईत महिलेसह एकाला अटक…

पुणे पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ए टू झेड…

पुणे शहरात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही युवकांची पटली ओळख…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!