
मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…
मुंबई : मुंबई शहरातील मालाड भागात एक महिला आईस्क्रिम खात असताना कोनामध्ये माणसाचं कापलेलं बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते बोट कुणाचं याचा तपास सुरू आहे. यादरम्यान आईस्क्रिम कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली असून, मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन पुढे आले आहे.
मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने काल रात्री झेप्टो ॲपद्वारे यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीम ऑर्डर केली होती. या कुटुंबातील एका महिलेने बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्लं तेव्हा तिला त्याच्या तोंडात मांसाच्या तुकड्यासारखे काहीतरी वाटले. महिलेने अर्ध्याहून अधिक आईस्क्रीम खाल्लं होतं. जेव्हा तिनं आइस्क्रीमकडे पाहिलं तेव्हा तिला त्यात मानवी बोट दिसले. सुमारे 2 सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा हे पाहून महिलेला धक्का बसला.
महिलेने तत्काळ आईस्क्रीम कंपनी yummo.icecream या इन्स्टाग्रामवरील पेजवर तक्रार नोंदवली आणि कंपनीच्या कस्टमर केअरलाही माहिती दिली. आईस्क्रीममध्ये एक खिळाही सापडला. महिलेनं याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मालाड पोलिसांनी लगेचच आईस्क्रीम जप्त केली. प्राथमिक तपासात पोलिसांचे म्हणणे आहे की, आइस्क्रीम कोनमध्ये मानवी शरीराचा अवयव आढळला आहे. अधिक पुष्टीकरणासाठी पोलिसांनी आइस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग FSL (फॉरेन्सिक) कडे पाठवला आहे. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध आयपीसी 272,273,336 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यम्मो कंपनीच्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्यानंतर कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच याप्रकरणी पुणे शहरताली हडपसर परिसरात छापा टाकण्यात आला. हडपसर परिसरात असलेल्या या कंपनीत हे बोट कुठून आले आणि ते कोणाचे आहे? याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे अधिकारी चौकशी करत आहेत.
दरम्यान, यावर यम्मो आईस्क्रीम कंपनीने म्हटले की, ‘आम्ही या आईस्क्रिमक थर्ड पार्टी उत्पादन करत होतो. ते आता थांबवले आहे. तसेच आमच्या गोदामांमध्ये असलेले सर्व उत्पादन नष्ट करत आहोत. बाजारात असलेला माल परत घेत आहोत.’
मुंबईत महिलेला आईस्क्रीम खाताना कोनमध्ये सापडलं माणसाचं बोट…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…
हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…
डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…
मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

