पोलिसांनी कुतूहलापोटी बेडी असलेल्या कि-चेनचा तपास सुरू केला अन् बिंग फुटले…

मुंबई: एका फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीकडे असलेल्या बेडीच्या चावीने नकली पोलिसाचे बिंग फुटले. आरोपी नकली पोलिस बनून वावरत होता. त्याच्याकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र आणि इतर वस्तू आढळून आल्या आहेत. फैजुल अबू हसन शेख (वय २८) याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

वसईतील महेंद्रकुमार पुरोहीत या फिर्यादीचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून काही दिवसांपूर्वी एकाने १ लाख ६० हजारांचा मोबाईल फोन विकत घेतला होता. दुकानदाराची फसवणूक करण्यासाठी १ लाख १० हजारांची रक्कम बॅंकेत एनईफटीद्वारे ट्रान्सफर केल्याचे भासवले आणि तसा एडीट केलेला खोटा मेसेज दाखवला. शिवाय, ५० हजारांचा बनवाट धनादेश दिला होता. दुकानदाराच्या नंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने वालीव पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास करून आरोपी फैजुल अबू हसन शेख (२८) याला अटक केली. त्याची चौकशी सुरू असताना त्याच्या हातात असलेल्या चावीला बेडी असलेली की चेन दिसली. त्यामुळे पोलिसांनी कुतूहलापोटी बेडी असलेल्या कि-चेनचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती मिळाली. आरोपीकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र, नियुक्ती पत्रे, पोलिस वापरतात तशा एकूण ३० वस्तू आढळून आल्या. त्यामुळे तो नकली पोलिस बनून वावरत असल्याचे निष्पन्न झाले.

मला पूर्वी पोलिस बनवायचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने तो पोलिस बनून वावरत असल्याचा दावा आरोपीने केला आहे. मात्र त्याने पोलिस बनून फसनवणुकीचे गुन्हे केले असल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने आम्ही तपास करत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली. आरोपीने यापूर्वी देखील अशाच पद्धतीने बनावट धनादेश देऊन एक दुचाकी घेतली होती. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणावरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानर, मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळू कुटे आदींच्या पथकाने या नकली पोलिसाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस आयुक्तांच्या नावानेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट…

मुंबई पोलिसांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल अन् पैसे…

मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…

साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आली अन्…

राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!