जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

पाटणा (बिहार) : दहा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या दांपत्याला दोन मुली आहेत. पण, जावई आता सासूच्या प्रेमात पडला असून, सासूसोबत लग्न करायचे म्हणून त्याने तगादा लावल्याची घटना भागलपूरमध्ये घडली आहे. पत्नीने न्याय मिळण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले आहे.

बांका जिल्ह्यातील रहिवासी असलेली दोन मुलांच्या आईने न्याय मिळवण्यासाठी आपल्या आईसह डीआयजी कार्यालय भागलपूर गाठले आहे. महिलेने सांगितले की,, माझे लग्न 10 वर्षांपूर्वी बांका जिल्ह्यातील बोस्सी पोलिस स्टेशन हद्दीतील मसूदन बाबा मंदिरात झाले आहे. मला दोन मुली असून, एक मुलगी 9 वर्षांची आणि दुसरी 6 वर्षांची आहे. माझे पती मुंबईत पोकलेन चालवतात. आता माझ्या नवऱ्याला मी आवडत नाही, तो माझ्यासह मुलींनाही मारतो. मोठ्या मुलीलाही विजेचा धक्का देऊन मारहाण करण्यात आली.’

पीडित महिलेच्या आईने म्हटले आहे की, ‘माझा जावई मद्यपी आहे. तो म्हणतो मला तुझी मुलगी नको आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. जावयाच्या हातात जे काही सामान येईल, त्याने तो माझ्या मुलीला मारहाण करू लागतो.’ दरम्यान, या घटनेमुळे सासू,पत्नी आणि मुली भयभीत झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा जागीच मृत्यू…

जावयाने तोडले सासूचे नाक अन् पुढे…

मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…

धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…

वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!