Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये अल्ववयीन मुलाच्या कारच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या अश्विनी कोष्टा या युवतीचे वडील सुरेश कोष्टा आणि भाऊ समप्रित कोष्टा यांना राग अनावर झाला आहे.

यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सुरेश कोस्टा यांनी मंगळवारी आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत घटनेनुसार आरोपींवर कारवाई व्हावी, जेणेकरून लोक यातून धडा घेतील, असे म्हटले आहे.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

सुरेश कोष्टा पुढे म्हणाले की, आम्ही आमची मुले मोठी होईपर्यंत त्यांना वाहनांना हात लावू दिला नव्हता. आपल्या मुलीला न्याय मिळावा. घटनेनुसार आरोपींवर कारवाई व्हावी, जेणेकरून लोक यातून धडा घेतील.’ भाऊ समप्रित कोष्टा म्हणाला, ‘अश्विनी गेल्या सहा वर्षांपासून पुण्यात होती. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. दोन वर्षांपासून ती पुण्यात नोकरी करत होती. आमच्या कुटुंबात ती वडिलांसह सर्वांची लाडकी होती. आता बहीण या जगात राहिली नाही, पण दोषींवर कठोर कारवाई करावी.’

जबलपूरमध्ये राहणारी अश्विनी कोस्टा गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहत होती. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केल्यानंतर ती पुण्यात नोकरी करत होती. काही दिवसांपूर्वी तिने घरी येऊन स्वत:चा वाढदिवस साजरा केला होता. पुढील काही दिवसांमध्येच ती गावी परतणार होती. पण, त्यापूर्वीच धनिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकार वाहन चालून दिलेल्या धडकेत तिच्यासह तिचा मित्र अनिश अवधिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अनिश अवधिया हा उमरिया येथे राहत होता. अपघाती निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अनिशच्या काकांनी या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. येरवडा पोलिसांनी आरोपीबाबत नरमाईची भूमिका घेतली. तपासाचा अधिक वेळ अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचे काय संबंध होते यातच घालवला. पोलिस आरोपींची काळजी घेत होते आणि वाढिदवसाच्या पार्टीबद्दल अनीशच्या मित्रांची चौकशी करत होते असा गंभीर आरोप अनिशचा लहान भाऊ देवेशने केला आहे.

दरम्यान, रविवारी (ता. 19) रोजी भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने एका दुचाकीला मागून धडक दिली होती. यामध्ये अनिश अवधिया आणि अश्विना कोस्टा यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपीला एकाच दिवसात बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला होता. तर आज अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे.

Video: पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांचे बेधडक आव्हान…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!