
नाशिक! गंगापूर पोलिसांनी दुचाकीचा गुन्हा 24 तासात केला उघड…
नाशिक : नाशिक शहरामधील गंगापूर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करुन दुचाकीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणून 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
गंगापुर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात ही कारवाई केली आहे. दुचाकी चोरीची घटना शनिवारी (ता.11) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली होती. अरुण बाळकृष्ण काकुळते (वय 39 रा. शिवशक्ती चौक, नाशिक), पंकज दगडु सावंत (वय 38 रा. रोहिणीनिवास, शिवाजीनगर, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – १, किरणकुमार चव्हाण, पोलिस उप आयुक्त, पोलिस आयुक्त, सरकारवाडा विभाग सिध्देश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शना खाली गंगापुर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलिस उप निरीक्षक मोतीलाल पाटील, पोहवा. गिरीष महाले, गणेश रहेरे, पोना. मच्छिंद्र वाकचौरे, पोअं/ सोनु खाडे, सुजित जाधव, गोरख साळुंके, पोअं. भागवत थविल सर्व नेमणुक गंगापुर पोलिस स्टेशन यांनी केली आहे.
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
नाशिक हादरले! उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या…
नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…
नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने ‘बारक्या’ला पुण्यातून ठोकल्या बेड्या…
नाशिक पोलिसांनी कोट्यावधींचा मुद्देमाल तक्रारदारांना केला परत…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

