बदला! 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ…

गडचिरोली : छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या सीमा भागात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 3 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ निवडत आपल्या साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेऊन तीन माओवाद्यांना ठार केले आहे.

6 एप्रिल 2010 रोजी माओवाद्यांनी जवांनांवर हल्ला केला होता. यावेळी सीआरपीएफचे तब्बल 76 जवान हुतात्मा झाले होते. साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेत सुरक्षा दलाने माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बिजापूर जिल्ह्यात तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये 6 एप्रिल रोजी मोठी चकमक झाली. या चकमकीदरम्यान तीन माओवादी ठार झाले. यावेळी जवानांनी ग्रे हाउंड आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्त अभियान राबवले आहे. तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर पुजारी कांकेरच्या करिगुटा जंगलात चकमक सुरू आहे. चकमकीत आतापर्यंत तीन माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळावरून एक एलएमजी आणि एके 47 सह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी एन्काउंटरची माहिती दिली. उसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी 13 माओवाद्यांना ठार मारणाऱ्या सुरक्षा बलांनी आज सकाळी संयुक्त अभियानामध्ये तीन माओवाद्यांना ठार करून 14 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा बदला घेतला. दंडकारण्यामध्ये ना देशाच्या इतिहासात सर्वाधिक सुरक्षा दल माओवाद्यांच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना या छत्तीसगडमध्ये घडली होती. आजचा दिवस सुरक्षा दलांसाठी काळा दिवस म्हणून ओळखला जातो. आज याच दिवशी तीन माओवाद्यांना ठार करून जवानांनी आपल्या हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दोन कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांच्या बड्या नेत्याला अटक…

Video: हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवानांकडू अनोखी मानवंदना!

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!