
हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील कपड्याच्या दुकानाला आज (बुधवार) पहाटे साडे तीनच्या सुमारास भीषण आग लागली होती. एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मृतदेह पाहून अनेकांना रडू कोसळले.
पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?
छावणी बाजारमधील महावीर जैन मंदिराच्या बाजूलाच हे कपड्याचे दुकान आहे. पहाटेच्या सुमारास आगीनंतर धुराचे प्रचंड लोट पसरले होते. हा धूर वरच्या मजल्यावर पसरल्याने त्यात गुदमरून ७ जण मृत्युमुखी पडले. मध्यरात्री अचानक आग लागल्यानंतर शेजारी राहणाऱ्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र धुरामुळे वरच्या मजल्यावरील एकाच कुटुंबातल्या ७ जणांचा मृत्यू झाला. आग लागलेली इमारत ३ मजली असून पहिल्या मजल्यावर ७ जण होते. तर दुसऱ्या मजल्यावर ७ जण होते. तिसऱ्या मजल्यावर दोघे होते. पहिल्या मजल्यावरील लोक बाहेर पडले. मात्र दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांना आग लागल्याचे समजलेच नाही. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावली होती, त्यात शॉर्ट सर्किटने आग लाग लागल्याचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने सांगितले. पण, आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
आगीच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये २ चिमुकल्यांसह, दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. आसिम वसीम शेख (3 वर्ष), परी वसीम शेख (2 वर्ष), वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम (23 वर्ष) हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष) रेश्मा शेख (22 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान, मोटर सायकलची चार्जिंग चालू होती त्यातून आग लागल्याचे नागिरक सांगत आहेत. शिवाय, स्फोट झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अहमदनगर हादरलं! दारुड्याने संशयावरून पेटवले घर, तिघींचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…
नवविवाहितेची आत्महत्यानंतर घरच पेटवलं, सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू…
Video: कारखान्यात भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू…
पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला आग; सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

