इंदापूर हादरले! हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या…

पुणे: इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या युवकाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १६) रात्री घडली आहे. अविनाश धनवे (रा. आळंदी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला होता. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पूर्व वैमानसातून गोळीबार झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्याची कोयत्याने वार करत हत्या…

पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!