सहकारनगर पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या ०६ सायकली केल्या हस्तगत…

पुणे (संदिप कद्रे): सहकारनगर तपास पथकाने सायकल चोरी करणा-या आरोपीकडून चोरीच्या ०६ सायकली हस्तगत केल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सहकारनगर पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ७९ / २०२४ भादवि ३७९ हा दाखल होता सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोस्टे चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोउपनि सुरज गोरे व अंमलदार यांना सायकल चोरीचे अनुषंगाने तपास करुन विद्यार्थ्याची होणारी गैरसोय दुर करणेबाबत व सायकलचा तपास करनेबाबत मार्गदर्शनपर सुचना केलेल्या होत्या. सदर चोरीचे अनुषंगाने तपास पथक पोस्टे हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलिस अंमलदार महेश मंडलीक यांना बातमीदारकडून बातमी मिळाली कि, एक अंदाजे २०-२२ वर्षाचा युवक संशास्पदरित्या सायकल वर जवाहर बेकरी, धनकवडी याठिकाणी फिरत आहे, सदर बातमीवरुन तपास पथकासह नमुद ठिकाणी रवाना होऊन त्यास हटकताच तो सायकलसह पळून जावू लागल्याने त्यास थोडयाच अंतरावर ताब्यात घेतले.

अंकुश भाऊसाहेब गोंडगीरे (वय २१ वर्षे सध्या रा. स्नेह घर खाशाबा जाधव स्कुल नं.४ शिवाजीनगर एसटी स्टॅण्ड मागे शिवाजीनगर पुणे मुळ रा. भानुसगाव ता. सोनेगाव जि. उस्मानाबाद) असे त्याने नाव सांगीतले. त्यास त्याचे ताब्यातील सायकलबाबत व आम्हास पाहुन पळुन जात असलेबाबत विचारणा करता तो उडवा उडवीची देवु लागल्याने त्यास अधिक चौकशीकामी सहकारनगर पोलिस स्टेशन येथे घेवून येवुन सायकलबाबत विचारपुस करता ती सायकल त्याने चोरी केलेचे सांगितले. सदर बाबत सहकारनगर पोलिस स्टेशन गु.र.नं. ७९ / २०२४ भादवि ३७९ हा दाखल असुन, अधिक तपास करता जानेवारी २०२४ पासुन त्याने के. के. मार्केट, स्मशानभुमी रोड तीन हत्ती चौक, बालाजी नगर या ठिकाणाहून आणखी ०५ सायकल चोरी केलेचे कबुल करुन सायकली काढुन दिलेल्या आहेत. अशा एकुण ०६ सायकल त्याकडुन हस्तगत केलेल्या असुन, पुढील तपास चालू आहे.

सदर कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त परीमंडळ-०२ स्मार्तना पाटील, सहा. पो. आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलिस उप-निरीक्षक सुरज किरण गोरे, सहा. फौजदार बापु खुटवड, पोलिस अंमलदार किरण कांबळे, अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, अमीत पद्माळे, संजय गायकवाड, निलेश शिवतरे, विशाल वाघ, भाऊसाहेब आहेर यांनी केलेली आहे.

Video: सहकारनगर पोलिसांनी चोरट्याला केले जेरबंद; घरात घुसून त्याने…

सहकारनगर पोलिसांनी पीएमटीमध्ये चोरी करणाऱ्यास शिताफीने केली अटक…

सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना केले जेरबंद…

पुणे शहरात वाढदिवसाचा केक तलवार व कोयत्याने कापला अन् बड्डे बॉयसह…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!