
नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट – १ची धडाकेबाज कारवाई…
नाशिकः MD विक्री गुन्हयातील पाहिजे आरोपी व तडीपार करण्यात आलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट – १ ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणांऱ्यांवर कडक धोरण अवलंबिले असून त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री करणा-यांची माहिती काढुन कडक कारवाई करण्याबाबतचे वेळोवेळी गुन्हेशाखेला मार्गदर्शन केले होते.
१४/०२/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट ०१ यांना मिळालेल्या माहीती वरून आडगाव परिसरामध्ये धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दुल (रा-राजवाडा दिंडोरीरोड, म्हसरूळ नाशिक) यास ताब्यात घेवून त्याच्या अंगझडतीत २७,५००/- रूपये किंमतीची ५.५ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) तसेच मोटार सायकल, मोबाईल असा एकुण ८७,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. सदर आरोपीताविरूध्द आडगाव पोलिस ठाणे येथे गुरनं. ४३ / २०२४ एन. डी. पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा दाखल झाल्या पासुन गुन्हयातील पाहीजे आरोपी राहुल शिंन्दे फरार होता व त्याचा शोध गुन्हेशाखा युनिट ०१ घेत होती.
सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी याचा शोध घेत असतांना गुन्हेशाखा युनिट ०१ चे पोलिस अंमलदार / नितीन जगताप यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, उक्त गुन्हयातील पाहिजे आरोपी राहुल शिंदे हा बळीमंदिर परिसरात येणार आहे. सपोनि तोडकर, पोहवा. ठाकरे, पो.ना. /परदेशी, पोअ./ पानवळ, राठोड, जगताप, शेख, पालखेडे यांनी सदर ठिकाणी जावून सापळा लावला. राहुल नारायण शिंदे (रा. हनुमान नगर अमृत धाम नाशिक) यास शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेवून त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने सदर आरोपीतास पुढील कारवाई कामी आडगाव पोलिस ठाणे कडे हजर करण्यात आले आहे.
रेकॉड वरील तडीपार आरोपी यांचा शोध घेत असतांना गुन्हेशाखा युनिट ०१ चे अंमलदार राजेश राठोड यांना बातमी मिळाली की, तडीपार आरोपी रोहीत पवार हा शांतीनगर मखमलाबाद नाशिक परिसरात फिरत आहे. अशी बातमी मिळाल्यावरून पो. हवा. / धनंजय शिंदे, देवीदास ठाकरे, पो. ना. / मिलींद परदेशी, पोअ./ पानवळ, राठोड, जगताप, शेख, बर्डे अशांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे मखमलाबाद म्हसरूळ नाशिक परिसरामध्ये शोध घेवुन रोहीत योगेश पवार रा. शुभम अपार्टमेंन्ट, शांती नगर म्हसरूळ, नाशिक हा मिळून आल्याने यास ताब्यात घेवून त्याचे विरूध्द म्हसरूळ पोलिस ठाणे येथे पोअं. राजेश राठोड यांनी दिलेल्या फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, विष्णु उगले, पोहवा / देविदास ठाकरे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, पोना/मिलींदसिंग परदेशी, पोअं/ नितीन जगताप, राजेश राठोड, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, रामा बर्डे, चापोअं/८५ समाधान पवार यांनी केली आहे.
राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ; नाशिक पोलिसांना धमकीचा फोन…
नाशिक शहरात युनिट १ची मोठी कामगिरी; अपहरणकर्त्यांची २४ तासांत सुटका…
नाशिकमध्ये पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!
नाशिक पोलिसांनी बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह तीन आरोपींना दिल्लीमधून केली अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

