
नाशिक पोलिसांनी बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह तीन आरोपींना दिल्लीमधून केली अटक…
नाशिकः उपनगर येथील गंभीर गुन्हयातील फरार असलेल्या बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह इतर तीन आरोपींना दिल्ली येथून गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली असून, पुढील तपास करत आहेत.
उपनगर पोलिस ठाणे हद्यीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर, सम्राट चौक, भिम नगर येथे १६/०२/२०२४ रोजी फिर्यादी मयुर विजय रोहम हे थांबले होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून आलेले विजय बहेनवाल उर्फ छंगा राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतर यांनी फिर्यादी यांना पकडून मागील भांडणाची कुरापत काढली. मयुर बेद व रोहित महाले यांचे विषयी विचारपुस करु लागल्याने फिर्यादी यांना हाताच्या बुक्क्याने पोटात व छातीत मारले तसेच हातातील धारदार चॉपरने जीव घेण्याच्या उद्येशाने वार केले म्हणुन फिर्यादी मयुर विजय रोहम यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस स्टेशन कडे । गुरनं ५६ / २०२४ भादंविक ३०७, १४३, १४७, १४८,१४९, ३२३, ५०४,५०६ आर्म अॅक्ट ४ /२५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने गुन्हा दाखल झाले पासून सर्व आरोपी फरार होते.
सदर गुन्हयातील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव व सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने गुंडा विरोधी पथकाने गुन्हयातील सर्व आरोपीतांचा तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून आरोपींबाबत माहिती काढली की, आरोपी विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतर आरोपी हे आपले अस्तित्व लपवुन राज्य राजस्थान, हरियाणा व दिल्ली येथे पळुन गेले आहे. त्यानुसार सदरची माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत असे २०/०२/२०२४ रोजी राज्य राजस्थान, हरियाणा व दिल्ली येथे रवाना झाले होते.
आरोपींचा शोध घेत असतांना २२/०२/२०२४ रोजी आरोपी हे राजस्थान, हरियाणा येथुन दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन जवळ असल्याची माहिती मिळाल्याने गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे स्टेशनचे बाहेर लोकांच्या गर्दीमध्ये दिसुन आल्याने संशयीत आरोपी
१) विजय उर्फ छंगा सरजीत बहेनवाल,
२) राहुल अजय उज्जैनवाल,
३) प्रदिप उर्फ गणेश विठ्ठल काळे
४) गणेश उर्फ गौरव सुनिल सोनवणे हे लोकांच्या गर्दीमधुन पळून जावु नये म्हणुन गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी योग्य ते नियोजन करून सापळा रचुन शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीतांना दिल्ली येथुन नाशिक येथे आणुन पुढील तपासकामी उपनगर पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, महिला पोलिस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव…
नाशिकमध्ये खून करून फरार झालेल्या दोघांना युनिट १ने ठोकल्या बेड्या…
नाशिक शहरात घरफोड्या करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…
नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यात युनिट १ला यश…
नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड; घबाड हाती…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

