प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावलं अन् खेळ खल्लास केला…

लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीने लग्न करावे म्हणून प्रियकराच्या मागे तगादा लावला होता. मात्र त्या दबावामुळे प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना काकोरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बहरू गावात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यात फास अडकवून साधारणपणे 100 मीटर तिला ओढत नेलं. त्यानंतर झाडावर लटकवून तिला मारलं. आरोपीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली आहे. प्रथम तो 15 मिनिटं मारहाण करत राहिला. पुढे तिची शुद्ध हरपली, तेव्हा त्याने ओढणीनं तिचा गळा आवळून हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.’

बहरू गावात राहणाऱ्या ब्रजेश आणि सरिता या दोघांचे प्रेम प्रकरण सुरू होते. काही दिवसांनी सरितानं लग्न करण्याची मागणी केली तेव्हा ब्रजेशने नकार देत राहिला. पुढे संतापलेल्या ब्रजेशनं तिची हत्या करण्याचा कट रचला. ब्रजेशने प्रेसयीला भेटण्यासाठी बोलावलं. भेटल्यावर त्यानं तिला कारमधून 20 ते 25 किलोमीटर फिरवले. सकाळी त्याने तिला लग्न न करण्याबाबत पुन्हा सांगितले. त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. ब्रजेशनं सरिताला मारायला सुरुवात केली. मग त्यानं सरिताच्याच ओढणीने तिचा गळा आवळला. नंतर तिला 100 मीटर ओढत नेलं आणि झाडावर लटकवले. सरितानं आत्महत्या केली असेल, असे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता.

आरोपीनं हत्येच्या कटाची अंमलबजावणी करण्याआधी मित्रासोबत दारू प्यायली होती. त्यानंतरच सरिताला फोन करून भेटायला येण्याबाबत सांगितले होते. आरोपीचे मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांना त्याचा पत्ता कळाला व लगेचच त्याला अटक करण्यात आली.

धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…

धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..

धक्कादायक! प्रियकर आणि प्रेयसीने चिरले एकमेकांचे गळे…

प्रेम! पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्यानं लावला प्रेयसीच्या खुनाचा छडा…

आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला चिरडले…

प्रेयसीचा आत्मा दिसत असून, ती मला जगून देणार नाही…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!