
मनोज जरांगे मुंबईकडे, पोलिसांनी बदलला मार्ग…
मुंबईः मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले असून, नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्स्प्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे. मुंबईकडे येतानाचा मार्ग बदलला आहे.
मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाचा मार्ग पोलिसांनी बदलला आहे. आंदोलकांना पुणे-मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या पोलिसांनी सूचना केल्या आहेत. परंतु आंदोलक नवीन मार्गावरुन जाण्याचा भूमिकेवर ठाम आहे.
आझादा मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे. त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच हजार आहे. परंतु लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे आझाद मैदानाच्या क्षमतेची मनोज जरांगे यांना जाणीव करुन द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे भगवे वादळ मराठा आरक्षणासाठी मुंबईत येत आहे. ते आज नवी मुंबईत धडकणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसीतील सर्व मार्केटमध्ये कडकडीत बंद करण्यात आला आहे. वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये त्यांची रात्री राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच ही बाजारात जवळपास चार ते पाच लाख लोकांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केल्याने सर्व बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंचा जनसमुदाय हा नवी मुंबई शहरांमध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी नवी मुंबई आणि मुंबईचे पोलिस सज्ज झाले आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह अडीच ते तीन हजाराचा फौज फाटा हा मैदानात उतरला आहे. मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या घटना घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे.
मनोज जरांगे यांचा मोर्चा; पुणे शहरातील मार्ग पुढीलप्रमाणे…
मनोज जरांगे यांची पुण्यात सभा; वाहतूकीत बदल…
राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द; पत्रकात म्हटले की…
मराठा आंदोलनानंतर गृहविभागाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

