
मनोज जरांगे यांचा मोर्चा; पुणे शहरातील मार्ग पुढीलप्रमाणे…
पुणे : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा २० जानेवारीला सुरू झाला आहे. शिरूर वरून हा मोर्चा पुण्याच्या वेशीवर पोहोचला होता. आज (बुधवार) सकाळी दहा वाजता वाघोलीतून दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली आहे. पुण्यात हा मोर्चा धडकणार असून विद्यापीठ चौकातून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, मोर्चामुळे पुणे शहरातील काही मार्गांवर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा आज सकाळी पुणे शहरात धडकणार आहे. वाघोली येथून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला आहे. येरवडा शास्त्रीनगरमार्गे संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, कृषी महाविद्यालयापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे सांगवी चिंचवड कडून लोणावळ्याकडे मार्गस्थ होणार आहे.
आरक्षण मोर्चाचा शहरातील मार्ग –
वाघोली- चोखीदाणी ते खराडी जकात नाका, नगर रस्त्याने खराडी बायपास, चंदननगर, विमाननगर, वडगाव शेरी हयात हॉटेल, येरवडा, शास्त्रीनगर, पर्णकुटी गुंजन चौक, बंडगार्डनमार्गे शिवाजीनगर, संचेती चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे, सांगवी फाटा, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, 16 नंबर, डांगे चौक चिंचवड, जकात नाका /चिंचवडे लॉन्स, चाफेकर चौक चिंचवड गाव, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी, भक्ती शक्ती शिल्प, देहूरोड, तळेगाव मार्गे लोणावळा असा मार्ग असणार आहे.
मनोज जरांगे यांची पुण्यात सभा; वाहतूकीत बदल…
राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द; पत्रकात म्हटले की…
धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या…
मराठा आंदोलनानंतर गृहविभागाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

