फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4चे ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्यास युनिट 4ने ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून ७३ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 938/2023 भादवी कलम 381 चा गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना 15/01/2024 रोजी युनिट 4 पोलिस हवा. सारस साळवी व पोलिस हवालदार हरीश मोरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेंजहिल्स खडकी येथील एच टाईप बिल्डिंग समोर अंतू स्वामी हा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कमी किमतीत मोबाईल विकत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

युनिट 04 कडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन अंतेश्वर उर्फ अंतू महालिंग स्वामी (वय 21, राहणार- गिरनार हाइट्स फ्लॅट नंबर ३०१ जाधव नगर भाग 2, गुजरवाडी फाटा कात्रज, पुणे) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने 4 मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यात एकूण 04 मोबाईल रुपये किंमत 73,000/- चे मिळून आले. दाखल गुन्हा उघडकीस आणून दाखल गुन्ह्यातील आरोपी याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाई कामी चतु:र्श्रुंगी पोलिस ठाणे पुणे यांचे ताब्यात जप्त मुद्देमालासह देण्यात आले आहे.

सदरची कारवाई रामनाथ पोकळे अपर पोलिस आयुक्त पुणे, अमोल झेंडे पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे -2, सोमनाथ जाधव वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनिट 04 यांचे मार्गदर्शनाखाली API विकास जाधव, PSI जयदीप पाटील, पोलिस हवा. हरीश मोरे, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, अमोल वाडकर यांनी केली आहे.

पुणे शहरात कार्यालयातील लाखो रुपये चोरणाऱ्याला युनिट ४ने ठोकल्या बेड्या…

पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘वाघ्या’ला अटक…

पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईतास युनिट ६ गुन्हे शाखेने केले जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!