
मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह दहा दिवसानंतर आढळला…
चंदीगड (हरियाणा) : मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह दहा दिवसानंतर आढळला आहे. पोलिसांनी एका कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला, ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.
मॉडेल दिव्या पाहुजा हिचा 2 जानेवारी रोजी गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंग याने त्यांचे प्रायव्हेट फोटो डिलीट करण्यावरुन वाद घातला आणि त्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मॉडेल दिव्या पाहुजा गँगस्टरच्या प्रेमात होती त्यानंतर त्याच्या हत्येप्रकरणी तुरुंगातून जाऊन आली होती. 2 जानेवारी रोजी तिची निर्घृण हत्या करुन मृतदेह लपवण्यात आला होता. याचा शोध पोलीस घेत होते. पण, मृतदेह मिळत नव्हता. मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि दिव्याचा आहे की नाही याचा तपास सुरू झाला.
दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मृतदेहाचा शोध घेत असलेल्या पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. पोलिसांनी बलराजला कोलकाता विमानतळावरून अटक केली आहे. बलराज येथून परदेशात जाण्याच्या तयारीत होता. दिव्याच्या बहिणीनेही या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुंबईत एन्काऊंटर केलेल्या गँगस्टरच्या गर्लफ्रेंडची हत्या…
मॉडेलने घातला अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा…
शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…
महिला युवकांना फोन करून गोड-गोड बोलून हॉटेलवर बोलवायची अन्…

