
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 75वी एमपीडीएची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): येरवडा पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एम. पी. डी. ए. अंतर्गत ही 75 वी कारवाई आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयातील येरवडा पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार समीर मकरंद सावंत (वय २१, रा. नेताजी शाळे समोर, सुभाषनगर, येरवडा, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोयता, तलवार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, साधी दुखापत, चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी समीर मकरंद सावंत याच्या विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. त्यास स्थानबध्द करण्यामध्ये येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम व चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पी.सी.बी.गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे अधिपत्याखाली पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलिस आयुक्त यांनी चालु वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ७५ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 74वी एमपीडीएची कारवाई…
शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हेगारावार एमपीडीए अंतर्गत कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

