भाजपचा नगरसेवक बारमध्येच अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

ठाणे : नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीचा भाजपचा नगरसेवक, पण भिवंडीत जाऊन मुंबईचा नगरसेवक असल्याचे सांगत बारचालकांकडून खंडणी मागितली प्रकरणी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. हितेश कुंभार असे या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या एका डान्सबारमधून डान्सबार चालकांना धमकावून 8 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून भाजप नगरसेवकाला रंगेहाथ अटक केली आहे. यावेळी या नगरसेवकाकडून 27 हजार रुपये देखील जप्त करण्यात आले आहे. त्याच्यासोबत त्याचे साथीदार देवेंद्र खुटेकर आणि राकेश कुंभकर्ण यांनाही अटक करण्यात आली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गालागत कोनगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भिवंडी बायपास येथे अनेक डान्स बार आहेत. त्यापैकी लैला डान्सबार हा चालक संतोष भोईर आणि हरीश हेगडे पार्टनरशिपमध्ये चालवतात. या डान्स बारमध्ये येऊन हितेश कुंभार याने खंडणी मागितली. मी मुंबईचा भाजपचा नगरसेवक आहे, तुमचे बार चालवायचे असेल तर आर्केस्ट्रा बारचे 5 लाख रुपये आणि सर्विस बारचे 3 लाख रुपये असे एकूण 8 लाख रुपयांची मागणी केली. जर तुम्ही वन टाइमचे पैसे दिले नाही तर तुम्ही डान्सबार कसे चालवता हे मी पाहतो अशी धमकी हितेस कुंभार याने दिली.

बार चालक संतोष भोईर यांनी थेट कोनगाव पोलिस स्टेशन गाठले आणि घडलेली सर्व हकिकत पोलिसांसमोर मांडली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनाचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि पोलिस देखील लैला डान्सबार येथे दाखल झाले. त्यानंतर मुंबईचे भाजप नगरसेवक असल्याचे सांगणारे हितेश कुंभार यांनी आपल्या साथीदारांसह वन टाइम रकमेची डिमांड केली. गुड लकचे 27 हजार रुपये लैला डान्स बार चालकांकडून स्वीकारत असताना पोलिसांनी भाजप नगरसेवक हितेश कुंभार यांच्यासह त्याच्या दोन साथीदारांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणामध्ये कोनगाव पोलिसांनी कलम 384, 386, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करीत आहेत.

विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल…

भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…

माजी आमदाराच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये तूतू-मैमै…

दिशा सालियान प्रकरण! आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!