
पुणे शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
समर्थ पोलिस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी पोलिस अमंलदार समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, समर्थ पोलिस स्टेंशनकडील तडीपार गुन्हेगार दिपक सुभेदार परदेशी वय २३ वर्ष, रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ पुणे) हा के. ई. एम्. हॉस्पिटल समोरील बाजुस एस्. व्ही. युनियन गेट शेजारी, सोमवार पेठ पुणे येथे बसलेला आहे. सदरची माहीती त्यांनी वरिष्ठांना कळवून त्याला स्टाफच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यास परवानगी बाबत विचारणा केली असता, त्याने पुणे जिल्हयात येण्याकरीता कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समजले. त्यामूळे सदर गुन्हेगाराने पोलिस उपायुक्त परिमंडळ १ यांचा आदेश क्रमांक १४/२०२३ नूसार पोलिस आयुक्तालय पुणे शहर व संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार केलेले असताना देखील त्याने आदेशाचा भंग केला म्हणून सदर गुन्हेगार दिपक परदेशी यांस अटक करुन समर्थ पोलिस स्टेशन येथे गु. र. नं २६७/२०२३ महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हेगारावर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, बेकादेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही प्रविण पाटील अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, संदीप गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुंक्त, फरासखाना विभाग, पुणे सूरज बंडगर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे, सुनिल रणदिवे, पोअं. हेमंत पेरणे, सपोफौ. दत्तात्रय भोसले, पोहवा. संताष डमाळे, पोहवा. गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास वाघेरे, पोना. रहीम शेख, पोअं. अमोल शिंदे, शरद घोरपडे यांनी केली आहे.

समर्थ पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक, पिस्टल जप्त…
समर्थ पोलिसांनी १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सराईतांना ठोकल्या बेड्या…
पुणे शहरात युवकाचा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खून…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

