सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावानेच घेतला बळी…

बीड : लष्करात असलेला भाऊ सुट्टीवर आला असताना पैशांवरून वाद झाल्यानंतर लहान भावाने जवानाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रवीण विनायक पवार असे मृत जवानाचे नाव आहे. प्रवीण हे झारखंड येथे सीआरपीएफमध्ये नोकरीला होते. पंधरा दिवसांपासून सुट्टीवर गावी आले होते. प्रवीण व त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. यात प्रवीणला बेदम मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, मारहाणीत जखम झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन उपचरादरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच घटनास्थळाचाही पंचनामा केला. याप्रकरणी प्रवीण यांच्या पत्नी सीमा पवार यांच्या फिर्यादीवरून सासू झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, भावजयी सोनाली पवार, दीर विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीत आहेत.

जबलपूरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू…

Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…

पुणे शहरात जवानाने घातला पोलिसाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक…

जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…

लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!