बीड! मेडिकलच्या विद्यार्थिनीचा प्राध्यापकाकडून लैंगिक छळ; त्रासाला कंटाळून…

बीड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा प्राध्यापकाने लैंगिक छळ केला आहे. आरोपीनं पीडितेला नापास करून पाच वर्षे एकाच क्लासमध्ये बसवेन, अशी धमकी देत तिचा लैंगिक छळ केला. तब्बल ११ महिने हा धक्कादायक प्रकार सुरू होता. पीडित विद्यार्थिनीने प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी प्राध्यापकाला अटक केली आहे.

डॉ. अनिस अहमद असे आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. त्याने होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा (वय २२) लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल आहे. पीडित विद्यार्थिनी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिला पीसीओडीचा (PCOD) त्रास असल्याने ती नियमित तपासणीसाठी महाविद्यालयाच्याच रुग्णालयात जात होती. जानेवारी २०२६ मध्ये पहिल्यांदा तपासणीच्या बहाण्याने महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिस अहमद याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिचा लैंगिक छळ सुरू केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

उपचाराच्या निमित्ताने सातत्याने तपासणीसाठी बोलावून गेल्या ११ महिन्यांत त्याने ३ ते ४ वेळा अशाच प्रकारे गैरवर्तन केलं. विद्यार्थिनीने या कृत्याला विरोध केला असता, “हा प्रकार कोणाला सांगितला तर परीक्षेत कमी गुण देईन, पास होऊ देणार नाही आणि एकाच वर्गात पाच वर्षे बसवेन,” अशी धमकी देत त्याने तिच्यावर दबाव टाकला. नापास होण्याच्या भीतीने युवतीने अकरा महिने आरोपीचा त्रास सहन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

प्राध्यापकाच्या या सततच्या त्रासाला आणि धमकीला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थिनीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. अनिस अहमद याच्याविरोधात विनयभंग आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय व शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड! शिक्षकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग; पालकांचा चोप अन्…

महाराष्ट्राला हादरला! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर लॉजवर सामूहिक अत्याचार…

शालेय विद्यार्थिनींशी शिक्षकाकडूनच अश्लील चाळे; खरपूस चोप देऊन गावकऱ्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात…

कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप…

मुलींना नको तिथे हात लावायचा, आदिवासी आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!