
गुजरातमध्ये कार रोखली अन् जळगावच्या 6 जणांना फेकलं कालव्यात…
अहमदाबाद (गुजरात): जळगाव येथून कामाच्या शोधात निघालेलं एक कुटुंबाबाबत धक्कादायक घटना घडली आहे. दुसऱ्या कारनं आलेल्या चार जणांनी कुटुंबाची कार अडवली आणि कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीनं खाली उतरवून एक-एक करून खोल कालव्यात फेकले. तिघांचे शव सापडले असून दोन मुलं अद्यापही बेपत्ता आहेत. पोलिस आणि अग्निशमन दलाचं पथक त्यांचा शोध घेत आहे.
सूरतमधील बारडोली तालुक्यातील उवा गावाच्या जवळ ही घटना घडली. जळगावच्या आसपास राहणारं कुटुंब एरंडोलच्या एका कारखान्यात मजुरी करायचं. कुटुंबातील सदस्य २१ तारखेला कामाच्या शोधात कारने सूरतला निघाले होते. या दरम्यान त्यांची कार बारडोलीतील उवा कालव्याजवळ पोहोचली. तेव्हा दुसऱ्या कारमधील चार जणांनी त्यांचा रस्ता रोखला. दुसऱ्या कारमधील चार जणांनी जळगावच्या कुटुंबातील सदस्यांना कारमधून खाली उतरवलं आणि खोल पाण्यात फेकल्याचा आरोप आहे. पाण्यात फेकलेल्या १३ वर्षीय मुलाच्या हातात कालव्यात टाकलेला एक पाईप लागला. त्याच्या आधारानं तो वाचला. जीव वाचलेल्या मुलानं जवळचं हॉटेल गाठलं आणि संपूर्ण घटना सांगितली. यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान महुआ तालुक्यातील डुंगरी जवळील काकरापार कालव्याच्या पाण्यात त्यांना एक पुरुष, एक महिला आणि एक तरुणी, असे तिघांचे मृतदेह सापडले. कुटुंबियांनी मृतदेह ओळखले. नितीन पाटील, कविता पाटील अशी मृतांची नावे आहेत. कुटुंबातील दोन मुलं अद्यापही बेपत्ता आहेत. पोलिस आणि अग्निशमन दलाची पथकं कालव्यात त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, हल्लेखोर नेमके कोण होते, त्यांनी कुटुंबाला कालव्यात का फेकलं, हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला का, हे सगळे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खंडिया, आभा, बंटी आणि एक अज्ञात व्यक्ती, अशा एकूण ४ जणांच्या विरोधात बारडोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
राजधानी हादरली! युवतीवर कॅफेत सामूहिक अत्याचार, तिघांना अटक…
मुंबई! पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीनंतर फटाके वाजवणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली…
लातूर! अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध अन् युवकाचा पोलिस ठाण्यातच मृत्यू…
पुणे! ‘शिवाई’ बसने दाम्पत्याला चिरडले; पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू…
पुणे! हिंजवडी IT हबमध्ये प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट; कारण समोर…

